Home »Gossip» Ashish Vidhyarthi Birthday Special

शूटिंगवेळी बु़डता-बुडता वाचला होता या अभिनेत्याचा जीव, खलनायक म्हणून आहे प्रसिद्ध

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 10:52 AM IST


एन्टरटेन्मेंट डेस्कःराष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. 19 जून 1962 रोजी केरळच्या कन्नूर येथे जन्मलेल्या आशीष यांना सिनेमांमध्ये अभिनय करताना तब्बल 182 वेळा मरावे लागले आहे. सिनेमांमध्ये प्रत्येकवेळी खलनायकाची भूमिका वेगळ्या पद्धतीने साकारणारे आशीष यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते, की कधी कधी दिग्दर्शकसुद्धा विचारात पडतात, की यावेळी या खलनायकाला कसे मारावे, त्यासाठी कोणती पद्धत वापरावी. आशीष यांच्या मते, प्रत्येक वेळी निगेटीव्ह भूमिका साकारताना त्यांना जीवनात बरेच काही शिकायला मिळाले आहे.
'द्रोहकाल' या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आशीष यांच्या मातोश्री रेबा या बंगाली असून कत्थक डान्सर आहेत. तर वडील गोविंद विद्यार्थी हे मल्याळम रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
शूटिंगवेळी बुडता बुडता वाचला होता जीव...
छत्तीसगड येथील दुर्गच्या महमरा एनीकट नावाच्या ठिकाणी 'बॉलिवूड डायरी' या सिनेमाच्या शूटिंगवेळी आशीष विद्यार्थी आणि त्यांचे एक सहकलाकार पाण्यात बुडता बुडता वाचले होते. दोघांना पोलिस अधिकारी विकास सिंह यांनी वाचवले होते. त्यावेळी विकास सिंह यांची ड्युटी शूटिंगस्थळी होती. शूटिंग करताना आशीष यांना पाण्यात उतरायचे होते. मात्र ते पाण्यात बुडू लागले. त्यावेळी तेथे उपस्थित लोकांना ते सिनेमाचे शूटिंग करत असल्याचे वाटले, त्यामुळे कुणी मदतीसाठी धावले नाहीत. पण विकास सिंग यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी त्यांचा जीव वाचवला होता.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, आशीष विद्यार्थी यांच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही रंजक गोष्टी...

Next Article

Recommended