आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असीनसोबत विवाहबद्ध होणारेय मायक्रोमॅक्सचे मालक, एकेकाळी केला होता 14 KM चा पायी प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अॅक्ट्रेस असीन (L) आणि मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा (R) - Divya Marathi
बॉलिवूड अॅक्ट्रेस असीन (L) आणि मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा (R)
नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेत्री असीन लवकरच मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मासोबत विवाहबद्ध होणारेय. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, 'ऑल इज वेल' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर असीन आपल्या लग्नाची घोषणा करणारेय. 36 वर्षीय राहुल शर्मा मायक्रोमॅक्सचे सीईओ असून कमी वयात यशस्वी झालेले बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या मायक्रोमॅक्स या कंपनीचे हेडऑफिस गुडगांव येथे आहे.
कोण आहे राहुल शर्मा
  • राहुल यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय सस्केचेवन युनिव्हर्सिटीतून कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
  • राहुल शर्मा मायक्रोमॅक्सचे सीईओ आहेत. मोबाइल फोन बनवणारी ही कंपनी आता टीव्हीचे प्रॉडक्शन करते.
  • वयाच्या 15 व्या वर्षी एका रॉक कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी राहुल तब्बल 14 किलो मीटर पायी चालत गेले होते. कारण त्यांच्याकडे निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी पैसे नव्हते.
  • 2013 मध्ये राहुल यांना जीक्यू मॅनचा अवॉर्ड मिळाला आहे. याशिवाय 2014 मध्ये फॉर्च्युन मॅगझिनच्या ग्लोबल पॉवर लिस्ट ऑफ 2014 च्या टॉप 40 मध्ये सामील चार भारतीयांमध्ये राहुल शर्मा यांच्या नावाचा समावेश होता.
  • बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि राहुल शर्मा चांगले मित्र आहेत. अक्षयनेच असीन आणि राहुल यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला असल्याचे म्हटले जाते. अक्षयच्या माध्यमातूनच दोघांची भेट झाली होती.
  • 2008 मध्ये जेव्हा राहुलने त्यांची कंपनी मार्केटमध्ये आणली होती, तेव्हा अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने त्यांना पाठिंबा दिला होता.
असीनविषयी...
अभिनेत्री असीनने 2008 मध्ये 'गजनी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने 'रेडी', 'हाऊसफूल 2' आणि 'खिलाडी 786' मध्ये काम केले. तिचा आगामी ऑल इज वेल हा सिनेमा 21 ऑगस्ट रोजी रिलीज होणारेय. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी असीनने दक्षिणेत अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, राहुल शर्मा यांचे खास फोटोज...