आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attention Please! Pictures Which Can Make Katrina Kaif And Virat Kohli Jealous

Attention Please! रणबीर-अनुष्काचे हे फोटो बघून कतरिना-विराटचा होईल जळफळाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मजा-मस्तीच्या मूडमध्ये रणबीर आणि अनुष्का)

नुकताच मुंबईत आगामी 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पडला. अनुराग कश्यपच्या या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा मेन लीडमध्ये आहेत. प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत दोघे दिसणार आहेत. सिनेमातील दोघांचा लूक काही दिवसांपूर्वीच रिव्हील करण्यात आला. रिलीज करण्यात आलेल्या पहिल्या ट्रेलरमध्ये दोघांची जबरदस्त लव्ह केमिस्ट्री बघायला मिळाली. ट्रेलरमध्ये दोघांचा लिपलॉक आहे.
या दोघांची हीच केमिस्ट्री या सोहळ्यात सुद्धा बघायला मिळाली. अनुष्का आणि रणबीर एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसले. दोघांनी एकत्र डान्स परफॉर्मन्सही दिला. यावेळी यावेळी अनुष्का शर्मा नेहमीप्रमाणेच सुंदर दिसली. तिने क्रॉप टॉपसोबत पोल्का टॉडेट पँट परिधान केला होता. तर रणबीर ब्लॅक सूटबूटमध्ये कूल दिसला.
या ट्रेलर लाँचिंग सोहळ्यातील रणबीर आणि अनुष्काची ही केमिस्ट्री नक्कीच कतरिना आणि विराट कोहलीचा जळफळाट करणारी होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तुम्हीही बघा, कशी होती 'बॉम्बे वेलवेट'च्या ट्रेलर लाँचिंगला दिसलेली रणबीर-अनुष्काची केमिस्ट्री खास छायाचित्रांमध्ये...