आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Some Of The ‘Hit And Miss Kisses’ Of Bollywood!

...जेव्हा बिघडला कॅमे-याचा अँगल आणि क्लिक झाले स्टार्सचे ‘Hit and Miss Kisses’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रे हे एक उत्तम माध्यम आहे. मात्र जेव्हा हिच छायाचित्रे चुकीच्या अँगलने क्लिक केली जातात, तेव्हा त्यावरुन वादही निर्माण होण्याची शक्यता असते. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स फोटोग्राफर्सनी चुकीच्या पद्धतीने क्लिक करण्यात आलेल्या छायाचित्रांना बळी पडले आहेत. वरील छायाचित्र बघून तुम्ही अंदाज बांधू शकता, की जेव्हा अशी छायाचित्रे सेलिब्रिटींनी बघितली असतील, तेव्हा त्यांना किती लाजिरवाणे व्हावे लागले असेल. ऑप्टिकल इल्यूजनच्या भानगडीत छायाचित्रांमध्ये असे काही दिसू लागते, ज्यामुळे अफवांना तोंड फुटतं.
आता वरीलच छायाचित्र बघा, यामध्ये अजय देवगण चक्क ऐश्वर्याला किस करत असल्याचा भास होतो. हे केवळ कॅमे-याचा अँगल बिघडल्यामुळे दिसत आहे. जी कुणी व्यक्ति हे छायाचित्र बघेल, ती हे बघून नक्कीच अचंबित होईल. तर दुस-या छायाचित्रात बिपाशा बसू आणि करीना कपूर खान एकमेकींची गळाभेट घेत असताना कॅमे-याने दोघींना अशा काही पद्धतीने टिपले, की जणू दोघी गळाभेट नव्हे तर एकमेकींना जणू किस करण्यासाठीच पुढे आल्या असाव्यात. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशीच काही छायाचित्रे दखवत आहोत, ज्यामुळे सेलिब्रिटींवर लाजिरवाणे होण्याची वेळ आली आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कॅमेरा अँगल बिघडल्यामुळे सेलिब्रिटींचे क्लिल झालेल हिट आणि मिस किसेस...