एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाने अलीकडेच
आपल्या लाडक्या लेकासोबतची क्यूट छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. आयशा दोन वर्षीय मिकाइलची आई आहे. पहिल्यांदाच तिने आपल्या मुलाची छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये आयशा आपल्या मुलाचे लाड करताना दिसत आहेत. या छायाचित्रांना कॅप्शन देताना तिने लिहिले, ''My life #Mikail my everything''
आयशाने निवडक सिनेमे केल्यानंतर २००९ मध्ये फरहान आझमीसोबत विवाह केला. याचवर्षी ती सलमान खान स्टारर 'वाँटेड' सिनेमात झळकली होती. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर असून मातृत्वाचा आनंद घेत आहे.
पुढे पाहा, आयशाने शेअर केलेली ही खास छायाचित्रे...