आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठमोळ्या अॅक्टरवर झाला 'बाहुबली 2'चा असाही इम्पॅक्ट, बघा सोशल मीडियावरील क्रेझ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली 2’ या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे बहुतेक सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. गेले कित्येक दिवस प्रेक्षक बाहुबलीला कटप्पाने का मारले असेल, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात होते.  या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही थिएटरकडे आपला मोर्चा वळवला.
 
मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक यानेसुद्धा नुकताच 'बाहुबली 2' हा सिनेमा पाहिला आणि तो या सिनेमाच्या प्रेमातच पडला. प्रसादने 'बाहुबली'च्या रुपातील हा खास फोटो ट्विटरवर शेअर करुन त्याला हा सिनेमा किती आवडला हे सांगितले आहे. फोटो पोस्ट करुन प्रसाद लिहितो, "याला म्हणतात film चा impact... काल बाहुबली पाहिला... आणि आज selfie काढला तर असा आला... म्हटलं share करायलाच पाहिजे... नाही का...????"  
 
केवळ प्रसादवरच नाही तर अनेकांवर 'बाहुबली 2'चा चांगलाच इम्पॅक्ट झाला आहे. म्हणूनच या सिनेमाची सोशल मीडियावर क्रेझ बघायला मिळत आहे. चाहत्यांनी या सिनेमाचे फनी फोटोज सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांना मोठ्या संख्येने लाइक्स मिळत आहेत.  

पुढील स्लाईड्सवर बघा, सोशल मीडियावरील 'बाहुबली 2'ची क्रेझ... 
बातम्या आणखी आहेत...