अमृतसरः बाहुबली-2 या सिनेमात कालाक्या व्हिलनची भूमिका साकारणारा अभिनेता लवी पजनी पटियालाचा रहिवाशी आहे. त्याने या सिनेमातील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी त्याने त्याच्या डाएट प्लान आणि एक्सरसाइजमध्ये काही बदल केले आणि योग्य फिटनेस रुटीन फॉलो केला. त्यानंतर तो कालाक्याच्या भूमिकेत अगदी फिट बसला. Dainikbhaskar.com सोबत केलेल्या बातचितमध्ये लवीने त्याचा डाएट प्लान शेअर केला.
अशी बनवली मस्कुलर बॉडी... 'बाहुबली 2'मध्ये झळकला हा 6.8 फूट उंच व्हिलन, असा मिळाला सिनेमात ब्रेक- लवी दररोज 25 अंडी आणि 1 किलो चिकन खातो. 8-8 तासांच्या अंतराने तो अंडी खआतो. त्यासोबत 1 किलोपेक्षा जास्त ग्रीन सलाद आणि 1 किलो दही डाएटमध्ये घोतो.
- जिममध्ये जाण्यापूर्वी पोस्ट आणि प्री प्रोटीन घेतो.
- लवीला जिम आणि डाएट प्लानसाठी महिन्याकाठी 50ते 60 हजार रुपयांचा खर्च येतो.
- हेवी ब्रेक फास्टनंतर तो 300 ग्रॅम ड्रायफ्रूट्स खातो.
- लंचमध्ये भाजी, भात, चपाती, चिकन आणि सलमानसोबत तो ज्युस पितो.
- संध्याकाळी जिमहून परतल्यानतंर लाइट डिनरसोबत अंडी किंवा चिकन खआतो.
"कालक्या"च्या भूमिकेसाठी स्वतःला केले असे तयार..
- लवी पजनीने सांगितले, त्याला या भूमिकेसाठी स्वतःचे वजन 50 किलो करायचे होते. यासाठी तो दररोज 5 तास जिममध्ये वर्कआउट करायचा.
- शूटिंगच्या शेड्युलमधून वेळ काढून तो होल बॉडी एक्सरसाइज करायचा. सोबतच ट्रेक वर्क आणि जंपिंगसुद्धा करायचा.
- लवी रोज सकाळी 5.30 वाजता झोपेतून उठायचा आणि वेळ काढून रनिंग आणि अॅथलेटिक्स करायचा.
- कालक्याच्या पात्रात परफेक्ट दिसण्यासाठी त्याला डबल वर्कआउट करावे लागायचे.
लवीच्या मते, प्रोटीन घेणे चुक नाही...
- लवीने सांगितले, शरीरासाठी प्रोटीन घेणे अयोग्य नाही. पण ते चांगल्या ब्रॅण्डचे असायला हवे.
- तो पुढे म्हणाला, जे प्रोटीन आणि मिनरल्स आपल्याला फळांमधून मिळतं, ते डाएटमधून मिळू शकत नाही.
- आजच्या तरुणांनी योग्य मार्गदर्शनाने फिटनेसवर लक्ष द्यायला हवे.
- तरुणांनी फिटनेस ट्रेनरकडून मार्गदर्शन घेऊन स्वतःचा डाएट प्लान बनवायला हवा, असे लवी सांगतो.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, लवीचे PHOTOS...
(ही संपूर्ण माहिती लवी पजनीने Dainikbhaskar.com चे प्रतिनिधी मृदुल राजपूत यांना मुलाखतीत दिली.)