आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VFX च्या मदतीने असे साकारले गेले 1000 Cr कमावणा-या \'बाहुबली 2\'चे सीन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद : दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 द कन्क्लूजन या सिनेमाने देश, परदेशात केवळ 10 दिवसांमध्ये 1000 कोटींहून अधिकची कमाई करून  भारतीय सिनेसृष्टीत कमाईचे सर्व विक्रम मोडीस काढले आहेत. या सिनेमाच्या यशात दिगदर्शक आणि कलाकारांसोबतच व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) चा मोठा वाटा आहे. 
 
आर. सी कमलाकन्नन हे आहेत 'बाहुबली 2'चे VFX सुपरवाइजर...
- 'बाहुबली : द बिगिनिंग' या सिनेमाचे VFX सुपरवाइजर नॅशनल अवॉर्ड विजेते वी. श्रीनिवास मोहन हे होते. तर सिनेमाच्या दुस-या भागात ही जबाबदारी आर. सी. कमलाकन्नन यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. 
- यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून कमलाकन्नन यांनी सांगितले होते, की सिनेमातील वीएफएक्स दृश्ये अंतिम रुपात साकारण्यासाठी टेक्निशिअन्सच्या अनेक टीम कामाला लागल्या आहेत. 
- त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 33 हून अधिक स्टुडिओजनी या सिनेमाच्या VFX वर काम केले. ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांच्या टीमने सिनेमाच्या VFX वर काम करायला सुरुवात केली होती. रिलीजच्या अवघ्या 10 दिवसांपूर्वी त्यांचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम पुर्ण झाले होते. 

विविध स्टूडिओजनी असे केले VFX वर काम
- कमलाकन्नन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादस्थित मुक्ता VFX ने माहिष्मती पॅलेस आणि राज्याची जबाबदारी सांभाळली होती. याचा 15% भाग रामोजी फिल्म सिटीत सेट उभारुन पूर्ण करण्यात आला. तर इतर गोष्टी डिजिटल एक्सटेंशनच्या मदतीने पुर्ण करण्यात आल्या.
- तर कुंतल राज्याचा (देवसेनेचे राज्य)  30-40% भाग हा सेट उभारुन पूर्ण करण्यात आला. तर इतर भाग VFX च्या मदतीने साकारण्यात आला.
- कमलाकन्नन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमातील अनेक भागांचे काम सर्बिया आणि ताशकेंट (उज्बेकिस्तान) च्या स्टुडिओजनी पूर्ण केले. 

कमलाकन्नन यांनी राजामौलीसोबत 2004 साली केला होता पहिला सिनेमा...
- कमलाकन्नन यांनी राजामौली यांच्यासोबत 2004 मध्ये पहिल्यांदा 'Sye' या सिनेमात एकत्र काम केले होते.
- त्यानंतर ही जोडी 'Yamodonga'(2007, 'मगधीरा' (2009) आणि 'ईगा' (2012) या सिनेमांसाठी एकत्र आली होती.

पुढील 7 स्लाइड्सवर बघा, कमलाकन्नन यांच्या टीमने VFX च्या मदतीने कसे साकारले 'बाहुबली 2'चे सीन्स... 
 
हेही वाचा... 
सुपरहिट 'बाहुबली-2' सगळ्यांनी पाहिला, पण तुम्हाला या 7 मिस्टेक्स दिसल्यात का?
'देवसेना'च्या रुद्रमादेवीतील लूकनेही चाहत्यांना केले होते घायाळ, पाहा तिचे खास PHOTOS
'बाहुबली'ला मिळाले 6000 लग्नाचे प्रस्ताव, आता 14 वर्षांनी लहान तरुणीसोबत थाटणारेय लग्न
VIDEO: बाहुबलीपेक्षा देवसेनाही कमी नाही, या सिनेमासाठी वाढवले होते तब्‍बल 20 किलो वजन
..म्हणून बाहुबलीने उचलले शिवलिंग, वाचा या सीनचा राजामौलिंशी संबंध आणि रंजक Facts
बातम्या आणखी आहेत...