आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Baahubali 2\': SS Rajamouli Slams Rumours Of Madhuri Dixit Being Roped In For Sequel

\'बाहुबली’च्या सिक्वेलमध्ये घडणार नाही \'धक-धक गर्ल\'चे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री माधुरी दीक्षित दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली: द बिगिनिंग’या ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये झळकणार असल्याचे वृत्त अलीकडेच आले होते.
अनुष्का शेट्टी (देवसेना) च्या बहिणीच्या रुपात माधुरी सिक्वेलमध्ये दिसेल, असे म्हटले गेले होते. मात्र या सिनेमाशी निगडीत सूत्राने म्हटल्याप्रमाणे, "या सिक्वेलवरुन ब-याच अफवा पसरल्या आहेत. माधुरी सिनेमात असल्याचे वृत्त कुणी पसरवले आम्हाला ठाऊक नाही, मात्र माधुरी या प्रोजेक्टमध्ये नाहीये."
माधुरीचे 'डेढ इश्किया' आणि 'गुलाब गँग' हे सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर तिने कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाहीये.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांपैकी एक असलेल्या 'बाहुबली'च्या सिक्वेलमध्ये माधुरीला स्थान मिळाल्यास नक्कीच तिच्या करिअरसाठी हा सिनेमा फायदेशीर ठरणार यात दुमत असायला नको. मात्र हे शक्य नाहीये.