Home »Gossip» Baahubali Star Cast Then And Now Photos

कधीकाळी असे दिसायचे 'बाहुबली', 'कटप्पा' आणि 'देवसेना', बघा इतर स्टार्सचा LOOK

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 11:43 AM IST

हैदराबाद/मुंबई : 'कटप्पाने बाहुबली का मारले?' या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. आता त्यांना या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणारेय. कारण बाहुबली या सिनेमाचा दुसरा भाग 'बाहुबली 2' (बाहुबली : द कन्क्लूजन) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असून 16 मार्च रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रभास, राणा दग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांचा अॅक्शन अवतार बघायला मिळाला. याशिवाय ट्रेलरमध्ये देवसेना (अनुष्का शेट्टी) आणि अमरेंद्र बाहुबली (प्रभास) यांच्या लव्ह स्टोरीची झलकसुद्धा दिसली. हा सिनेमा येत्या 28 एप्रिल रोजी रिलीज होतोय.

या सिनेामाच्या पहिल्या भागात बाहुबली, भल्लाल देव, देवसेना आणि कटप्पासह सिनेमातील सर्वच व्यक्तिरेखा दाक्षिणात्य प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सिनेमातील स्टार्सचे असे काही फोटोज दाखवत आहोत, जे कदाचित यापुर्वी तुम्ही कधीही पाहिले नसतील.

पात्र : अमरेंद्र बाहुबली/शिवा
अॅक्टर : प्रभास

प्रभास तेलगु सिनेमांतील लोकप्रिय स्टार आहे. 'बाहुबली' या सिनेमाच्या माध्यमातून तो हिंदी प्रेक्षकांमध्येही पॉप्युलर ठरला आहे. यापूर्वी अजय देवगण स्टारर 'अॅक्शन जॅक्सन' या सिनेमातील एका गाण्यात त्याने कॅमियो केले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, 'बाहुबली' या सिनेमातील इतर स्टार्सचा Then and Now Look...

Next Article

Recommended