आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Baahubali मध्ये बॉलिवूड अॅक्टरना का घेतले नाही, राजामौलींनी पहिल्यांदा केले उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: दक्षिणेतल्या चांगल्या सिनेमांचे हिंदीत रिमेक होतात, काही डबही होतात, यात नवीन काहीच नाही. मात्र दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या सिनेमाने सगळीच गणितं बदलली आहेत. तेलुगू आणि तमीळ भाषेत एकाच वेळी तयार झालेला हा सिनेमा हिंदी आणि मल्याळममध्ये डब झाला. या सिनेमाले स्पेशल इफेक्‍ट थक्क करणारे आहेत. हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. एकाच वेळी एवढ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच सिनेमा होता. सिनेमाने 600 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षक आता 'बाहुबली 2' ची वाट पाहत आहेत.
पण बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या या सिनेमात बॉलिवूड स्टार्स का नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला. हाच प्रश्न दिग्दर्शक एस एस राजमौली यांना विचारण्यात आला. यावर ते पहिल्यांदाच बोलले.
ते म्हणाले की, “एखादा बॉलिवूड स्टार दुसऱ्या कोणाशीही कमिटमेंट न करता, त्याच्या दोन वर्षाच्या तारखा देण्यास तयार होईल का?, हे कधीही शक्य होणार नाही.” पुढे राजमौली म्हणाले, “बाहुबलीची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे कथा आणि शेड्यूल तयार होती. त्यामुळे मला या सिनेमासाठी कलकारांच्या दोन वर्षांच्या तारखा घ्याव्या लागतील हे माहित होतं. तुम्हाला वाटतं का, कोणताही बॉलिवूड स्टार त्याच्या दोन वर्षांच्या तारखा देण्यास तयार होईल? हे शक्यच नाही.”
आता या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजे ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ 14 एपिल 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली 2’चे शूट जवळजवळ पूर्ण झाले आहे. या सिनेमामध्ये तुम्हाला बाहुबलीची प्रेमकथा आणि त्याचे राज्य बघायला मिळेल. या सिनेमाच्या सिक्वेलसाठी प्रेक्षकांना आणखी बरीच वाट पाहावी लागणारेय. मात्र आम्ही बाहुबलीच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत, बाहुबलची पडद्यामागील खास क्षण, अर्थातच सिनेमाचे बिहाइंड द सीन्स. 'बाहुबली' सिनेमाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमाची शूटिंगच्या काळातील छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. हीच छायाचित्रे तुम्हाला पुढील स्लाईड्समध्ये बघता येणार आहेत.
चला तर मग पुढे क्लिक करा आणि पाहा, 'बाहुबली'च्या सेटवर क्लिक झालेले खास क्षण...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...