आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bachchan’S Diwali Bash: Hrithik Kangana Ignore Each Other

INSIDE GOSSIP : आराध्या ठरली सेंटर ऑफ अट्रॅक्शन, प्रेग्नेंट राणीसोबत प्रीतीचा सेल्फी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे (वर) - दिवाळी पार्टीत पाहुण्यांकडून गिफ्ट घेताना चिमुकली आराध्या, सोबत तिचे आईवडील आणि आजोबा, (खाली) - आईवडिलांसोबत फुलबाजा उडवताना आराध्या, उजवीकडे - प्रेग्नेंट राणी मुखर्जीसोबत सेल्फी घेताना प्रीती झिंटा - Divya Marathi
डावीकडे (वर) - दिवाळी पार्टीत पाहुण्यांकडून गिफ्ट घेताना चिमुकली आराध्या, सोबत तिचे आईवडील आणि आजोबा, (खाली) - आईवडिलांसोबत फुलबाजा उडवताना आराध्या, उजवीकडे - प्रेग्नेंट राणी मुखर्जीसोबत सेल्फी घेताना प्रीती झिंटा
गेला आठवडाभर सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसला. बॉलिवूडमध्येही दिवाळीची विशेष धूम बघायला मिळाली. अनेक सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये विशेषतः चर्चा होतेय ती अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीची. या पार्टीत अख्खे बॉलिवूड अवतरले होते.
प्रतिक्षा बंगल्यात झालेल्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी चांगलीच दिसली. यामध्ये हृतिक रोशन, शाहरुख खानपासून ते कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा आणि इतर अनेक स्टार्सने सहभाग नोंदवला. सर्वांनीच पार्टी खुप एन्जॉय केली.
या पार्टीत काय काय घडले, याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये देत आहोत...
आराध्या बच्चन ठरली सेंटर ऑफ अट्रॅक्शन
या पार्टीत बिग बींची चिमुकली नात आराध्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरली. लहेंगा चोलीमध्ये ती क्यूट डॉलसारखी दिसली. आई ऐश्वर्या, वडील अभिषेक, आजी जया आणि आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत आराध्या फटाके उडवताना दिसली. शिवाय पार्टीत दाखल झालेले पाहुणे तिचे लाड करताना दिसले.
कंगना-हृतिकने केले एकमेकांकडे दुर्लक्ष
बॉलिवूडमध्ये सध्या हृतिक-कंगना एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र पसरत आहे. मात्र दोघांनीही याबद्दल अजून काहीही मत मांडले नाही. या अफवांना दुजोरा मिळू नये यामुळे या दोघांनी बिग बींच्या पार्टीत विशिष्ट अंतर कायम ठेवले. कंगना पार्टीतून निघून गेल्यानंतर हृतिक इतर पाहूण्यांना मोकळेपणाने भेटला तसेच त्याने पार्टीचा पुरेपुर आनंद लुटला.
रणबीर-कॅट आणि रणवीर-दीपिकाने एन्जॉय केली पार्टी
पार्टीत उपस्थित असलेल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कपल्सने एकमेकांसोबत मस्तीपूर्ण पार्टी एन्जॉय केली. तसेच बराच वेळ ते एकमेकांसमवेत होते.
बिग बींनी दिले पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट
या पार्टीत बिग बींनी एक परफेक्ट पार्टी होस्टची भूमिका पार पाडली. त्यांनी सर्व पाहूण्यांचे वेलकम तर केलेच, तसेच सर्वांना पार्टीतून परतताना रिटर्न गिफ्टही दिले.
प्रेग्नेंट राणी मुखर्जीसोबत प्रीती झिंटाने घेतला सेल्फी
या पार्टीत अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेही उपस्थिती लावली होती. राणी मुखर्जी प्रेग्नेंट आहे. याकाळात ती मीडियासमोर येणे टाळत आहे. या पार्टीत ती सहभागी झाली आणि इंडस्ट्रीतील आपल्या फ्रेंड्ससोबत पार्टीची मजा लुटली. यावेळी तिची मैत्रीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटासोबत तिने सेल्फी काढल्या. प्रीतीने राणीसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. फोटोसोबत प्रीतीने लिहिले, “Never seen Rani look so beautiful as she did on #Diwalinight #glow #pregnantdoll friends #fun #awwwww, (sic)”
या पार्टीतील अनेक क्षण सोशल मीडियावर सेल्फीजच्या रुपात बघायला मिळत आहेत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बिग बींच्या दिवाळी पार्टीतील तुम्ही न पाहिलेली इनसाइड छायाचित्रे...