आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... रणबीर, मनीषा, अँजेलिनासह हे स्टार्स होते Drug Addict

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता रणबीर कपूर, मनीषा कोईराला आणि अँजेलिना जोली)
एन्टरटेन्मेंट डेस्कः मोठ्या पडद्यावर सभ्य दिसणा-या बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सच्या भूतकाळात डोकावून पाहिले असता त्यांची वाईट बाजू दिसून येते. असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना एकेकाळी वाईट सवयी होत्या. स्टार्सच्या या वाईट सवयींमध्ये ड्रग्सचा समावेश आहे.
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये ड्रग्सच्या आहारी गेलेल्या स्टार्सची यादी बरीच मोठी आहे. या यादीत अभिनेता रणबीर कपूरच्या नावाचा समावेश आहे.
रणबीर चेन स्मोकर असल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, मात्र एकेकाळी तो ड्रग्सच्यासुद्धा आहारी गेला होता. त्याच्याव्यतिरिक्त फरदीन खान, संजय दत्त, राहुल महाजन, मनीषा कोईरालासह बरेच स्टार्स ड्रग्स घेताना पकडले गेले आहेत. मात्र आता बरेच स्टार्स या वाईट सवयीतून बाहेर पडले आहेत. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येसुद्धा लिंडसे लोहान, अँजेलिना जोली, रॉबर्ट डाउनी ज्युनिअरसह अनेक स्टार्स व्यसनाधिन होते.
'रॉकस्टार' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याने ड्रग्स घेतल्याचे रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते. तो म्हणाला होता, एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याची घाबरगुंडी उडाली होती. म्हणून त्याने ड्रग्स घेतले आणि त्यानंतर सीन शूट केला. इतकेच नाही तर शालेय जीवनात असताना त्याला ड्रग्सची सवय लागल्याचे त्याने मान्य केले होते. आता मात्र रणबीरची ही सवय सुटली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी कोणकोणते बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स ड्रग्स अॅडिक्ट आहे...