आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\'ला मिळाले 6000 लग्नाचे प्रस्ताव, आता 14 वर्षांनी लहान तरुणीसोबत थाटणारेय लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः रिलीजच्या अवघ्या आठवड्याभरात 'बाहुबली 2' या सिनेमाने 800 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. अल्पावधीत एवढी कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियतेमुळे अभिनेता प्रभास जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. प्रभासची भारदस्त देहयष्टी, राजबिंड रुपडं, भोळा चेहरा अन् त्याच्या निरागस हास्याने तरुणी घायाळ झाल्या आहेत. म्हणूनच की काय या बाहुबलीला तब्बल सहा हजार लग्नाचे प्रस्ताव मिळाल्याचे वृत्त आहे. पण प्रभासने याकडे दुर्लक्ष करत केवळ कामावरच आपलं लक्ष केंद्रित केलं.  
 
या सिनेमासाठी प्रभासने गेली पाच वर्षे दुसऱ्या कोणत्याच सिनेमात किंवा जाहिरातीत काम केले नाही. राजामौलींचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी प्रभासने त्याचे लग्नही पुढे ढकलले.  

आता 14 वर्षांनी लहान तरुणीसोबत थाटू शकतो लग्न... 
प्रभास आता लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या 24 वर्षीय तरुणीसोबत तो लग्न करणार असून, त्याच्या आई-वडिलांनीच तिची निवड केल्याचे कळते. ‘बाहुबली’च्या चित्रीकरणामुळेच त्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. आता प्रभासचा हा सिनेमा रिलीज झाला आहे, त्यामुळे वर्षभरात तो लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 
 

मादाम तुसाँमध्ये एन्ट्री मिळवणारा पहिला साऊथ स्टार...
बॅंकॉकच्या मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये बाहुबली प्रभासचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. ‘अमरेंद्र बाहुबली’च्या रुपात उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामध्ये प्रभासच्या चेहऱ्याचे बरेच बारकावे दाखवण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी हा पुतळा नसून, बाहुबलीच्या वेशात खुद्द प्रभासच आपल्यासमोर उभा असल्याचा भास होतोय. प्रभासचा हा मेणाचा पुतळा आणखी एका कारणामुळे अनेकांचं लक्ष वेधतो आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये मेणाचा पुतळा उभारला जाणारा प्रभास हा पहिलावहिला दाक्षिणात्य अभिनेता ठरला आहे. त्यामुळे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन या पट्टीच्या अभिनेत्यांना प्रभासनं मागे टाकलं आहे असंच म्हणावं लागेल.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, प्रभासशी निगडीत खास गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...