आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: करीना कपूरने केली करिअमध्ये घोडचुक, नाकारले हे 5 Blockbusters सिनेमे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. 21 सप्टेंबर 1980 रोजी कपूर घराण्यात रणधीर कपूर आणि बबीता यांच्या पोटी करीनाचा जन्म झाला. 2000 मध्ये दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या 'रेफ्युजी' या सिनेमाद्वारे करीनाने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. खरं तर करीनाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र करीनाची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री होऊ शकली असती.
झालं असं होतं, की दिग्दर्शक राकेश रोशन यांनी 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'कहो ना प्यार है' या सिनेमाची ऑफर पहिले करीनाला दिली होती. मात्र करीनाने हा सिनेमा नाकारुन 'रेफ्युजी'ची निवड केली. असेही म्हटले जाते, की करीना आणि हृतिकने या सिनेमाची शूटिंग सुरु केली होती, मात्र याचकाळात दोघांमध्ये जवळीक वाढत असल्याचे बघून राकेश रोशन यांनी तिला सिनेमातून काढून अमिषा पटेलला कास्ट केले.
'रेफ्युजी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, तर कहो ना प्यार है हा 2000 मधील सुपरहिट सिनेमा होता. करीनाने नाकारलेला हा एकमेव सुपरहिट सिनेमा नाहीये. या सिनेमासोबतच तिने आणखी काही हिट सिनेमे नाकारले आहेत. हे सिनेमे नाकारुन करीनाने करिअरमध्ये मोठी चूक केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

करीनाने सुपहिट सिनेमे नाकारले असले तरी तिच्या स्टारडममध्ये काहीच कमतरता आलेली नाही. आता करीना प्रेग्नेंट आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. प्रेग्नेंसीच्या काळातही करीनाने आपले काम सुरु ठेवले आहे. सध्या ती वीरे दी वेडिंग या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा चार सिनेमांविषयी ज्यामध्ये करीना सलमान, शाहरुख आणि रणवीर सिंह यांच्यासोबत झळकू शकली असती, मात्र तिने ते नाकारले...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...