आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B\'day: Look, Bollywood Actor Jitendra\'s Viewed And Unseen Pics

B\'day: पाहा जंपिंग जॅक म्हणून ओळखल्या जाणा-या जितेंद्र यांचे Unseen Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि जंपिंग जॅकच्या नावाने प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेते जितेंद्र अभिनयापेक्षा त्यांच्या खास नृत्य शैलीसाठी ओळखले जातात. जितेंद्र यांनी 1959 मध्ये रिलीज झालेल्या 'नवरंग' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
1964मध्ये रिलीज झालेल्या 'गीत गाया पत्थरोंने' या सिनेमाद्वारे त्यांना खास ओळख प्राप्त करुन दिली. बॉलिवूडमध्ये जंपिंग जॅकच्या नावाने प्रसिद्ध असलेले जितेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये 200पेक्षा जास्त सिनेमांत अभिनय केला आहे. फर्ज, गीत गाया पत्थरों ने, कारवां, हिम्मतवाला यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांच्या नावावर जमा आहेत.
तारुण्यात हेमामालिनीसोबत जोडले गेले होते नाव-
तारुण्याच्या दिवसांत जितेंद्र यांचे नाव ड्रीम गर्ल हेमामालिनीसोबत जोडले गेले होते. गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली होती. मात्र जितेंद्र यांनी त्यांचे बालपणीचे प्रेम असलेल्या शोभा यांच्यासह रेशीमगाठ बांधली.
रुपेरी पडद्यावर श्रीदेवीसह बनली हिट जोडी -
जितेंद्र यांनी श्रीदेवीसह अनेक हिट सिनेमे दिले. 'हिम्मतवाला' (1983) त्यापैकीच एक हिट सिनेमा आहे. श्रीदेवी आणि जितेंद्रची जोडी रुपेरी प‍डद्यावर खूप गाजली. ‘मवाली’(1983), ‘तोहफा’ (1984), ‘घर संसार’ (1986), ‘हिम्मत और मेहनत’ (1987), ‘मजाल’ (1987) यांसारख्या ब-याच हिट सिनेमात या दोघांनी एकत्र काम केले होते.
जितेंद्र यांनी सुरु केला नवा ट्रेंड -
जितेंद्र यांना एक खास ट्रेंड सुरु करण्यासाठीसुद्धा ओळखले जाते. हा ट्रेंड म्हणजे, पांढरे बूट, शर्ट आणि टाइट पँटचा. जवळपास तीस वर्षांपूर्वी त्यांच्या या रुपाने त्यांच्या चाहत्यांना भूरळ घातली होती.
जितेंद्र यांना दोन मुले आहेत. मुलगी एकता कपूरला छोट्या पडद्यावरची क्वीन म्हणून ओळखले जाते. ती यशस्वी निर्माती आहे. तर मुलगा तुषार कपूर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जितेंद्र यांची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच त्यांच्या चाहत्यांच्या कधी बघण्यात आली असावीत...