आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीरा रेड्डीचा Wedding Album, बाइकवर पोहोचला होता मराठमोळा नवरदेव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने 14 डिसेंबर रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. 14 डिसेंबर 1980 रोजी राजमुंदरी (आंध्र प्रदेश) येथे समीराचा जन्म झाला. तिचे वडील सी.पी. रेड्डी हे एक बिझनेसमन आहेत. समीराला दोन मोठ्या बहिणी आहेत. तिची थोरली बहीण मेघना रेड्डी एक यशस्वी व्हीजे आणि सुपरमॉडेल आहे. तर दुसरी बहीण सुषमा रेड्डीनेदेखील मॉडेलिंग सोबत सिनेमांमध्ये कामे केली आहेत.
समीराने 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला.

बाइकवर आला होता नवरदेव
अडीच वर्षांच्या डेटींगनंतर समीराने 2014 मध्ये मराठमोळा बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्नगाठ बांधली. अक्षय बाइकचा व्यवसाय करतो. 'वर्देंची मोटरसायकल' म्हणून अक्षयच्या बाइक्सला ओळखले जाते. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाइकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. या लग्नात समीरा आणि अक्षयच्या नातेवाईकांसोबत जवळचे मित्र सहभागी झाले होते. समीराच्या लग्नाचे प्लानिंग तिची बहीण सुषमाने केले होते. समीराने गेल्यावर्षी 25 मे रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, समीरा रेड्डी आणि अक्षय वर्देचा वेडिंग अल्बम..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...