(अभिनेत्री फ्रिडा पिंटो)
मुंबई: 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमापासून चर्चेत आलेली फ्रिडा पिंटो एक भारतीय अभिनेत्री असून तिने इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर स्वत:ची ओळख निर्माण केली. 'स्लमडॉग मिलेनिअर'मध्ये लतिकाचे पात्र साकारून चर्चेत आलेली फ्रिडा आज 31 वर्षांची झाली आहे.
18 ऑक्टोबर 1984 रोजी फ्रिडा जन्म झाला मेंग्लोरिअन कॅथोलिक कुटुंबात झाला. फ्रिडाने सेंट झेव्हियर्स कॉलेज, मुंबईमधून आपले शिक्षण पूर्ण केले. शास्त्रीय नृत्यासोबतच साल्साचे प्रशिक्षण तिने घेतले आहे. फ्रिडा बालपणापासून अभिनेत्री होण्याते स्वप्न उराशी बाळगून होती. तिने अभिनयाचे प्रशिक्षण बॅरी जॉन अभिनय स्टुडिओ मुंबईमध्ये घेतले.
स्लमडॉग मिलेनिअरने दिली ओळख
फ्रिडाने 'स्लमडॉग मिलेनिअर'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमात तिने लतिका नावाच्या तरुणीचे पात्र साकारले होते. तसेच, सिनेमाचा नायक देव पटेल होता. या सिनेमासाठी तिला 'स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड' मिळाला होता. सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीसाठी बाफ्टा पुरस्काराने ती सन्मानित झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फ्रिडाची निवडक छायाचित्रे आणि वाचा तिच्या आयुष्याविषयी...