(परिणीतीचे चोप्रा आता आणि बालपणी छायाचित्र)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. 22 ऑक्टोबर 1988 रोजी तिचा जन्म हरियाणा अंबालामध्ये झाला. परिणीती आता बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक आहे.
परिणीती बॉलिवूड अभिनेत्री असून तिचे सिनेमाशी खोलवर नाते आहे. या मागचे कारण असे, की ती बहीण प्रियांका चोप्रा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्रा यांची चुलत धाकटी बहीण आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी ती अभ्यासू वृत्तीची होती. तिला व्यवसाय, अर्थिक उलाढाल यात रुची होती. तिने आपले पदवी शिक्षणसुध्दा त्यातच घेतले आहे. परंतु ती चुकून सिनेमाकडे वळाली. तिने आतापर्यंत 'इशकजादे', 'लेडीज वर्सेस रिकी बहल', 'शुद्ध देसी रोमान्स', 'हंसी तो फंसी', 'दावत-ए-इश्क'सारखे सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत.
परिणीतीचे बालपण
इतर तरूणींप्रमाणे परिणीतीसुध्दा बालपणी खूप खोडकर होती. वडील पवन चोप्रा बिझनेसमॅन असून इंडियन आर्मी सप्लायर आहेत. तिची आई रीना चोप्रा आहे. परिणीतीला शिवांग आणि सराज हे भाऊ आहेत. परिणीतीने शालेय शिक्षण अंबालामध्ये पूर्ण केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बालपणीची परिणीतीची छायाचित्रे...