नवी दिल्लीः बॉलिवूडचे महानायक
अमिताभ बच्चन यांचा अलीकडेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात अमिताभ यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा
अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि नात नव्या नवेली नंदा यांनी यावेळी उपस्थिती लावली होती.
या सोहळ्यात सर्वांच्या नजरा माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनवर नव्हे तर अमिताभ यांची नात नव्या नवेलीवर खिळल्या होत्या. गुलाबी रंगाच्या लखनवी पोशाखात नव्या तिची मामी ऐश्वर्या आणि आजी जया बच्चन यांच्या मध्ये बसली होती. यावेळी नव्या मामी आणि आजीसोबत गप्पा मारताना दिसली.
नव्या ही श्वेता बच्चन नंदा हिची थोरली मुलगी असून लंडन येथील सेव्हन ओक स्कूलमध्ये शिकत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पुरस्कार सोहळ्यात क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...