आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसण्यासाठी करिश्मासह या बॉलिवूड अभिनेत्रींनी केलीये सर्जरी! बघा Before & After लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मु्ंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने आज वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 जून 1974 रोजी मुंबईत जन्मलेली करिश्मा उर्फ लोलो सिनेसृष्टीत करिअर करणारी कपूर घराण्यातील पहिली मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी करिश्माला तिची आई बबिताचा पाठिंबा मिळाला. कुटुंबाची परंपरा मोडत करिश्मा केवळ अभिनेत्रीच बनली नाही, तर इथे यशस्वीसुद्धा ठरली. करिश्मा 90 च्या दशकातील बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती.

लूकवरुन उठले प्रश्न
करिअरच्या सुरुवातीच्या काळात करिश्मा क्वचित वादातसुद्धा अडकली आहे. अभिनेता अजय देवगणसोबतचे तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले. याशिवाय तिचा बदलता लूकसुद्धा चर्चेचा विषय ठरला. वयाच्या 17 वर्षी 'प्रेम कैदी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या करिश्माचा पदार्पणाच्या वेळी लूक अगदी सामान्य होता. घुंघराळे केस आणि मोठे आयब्रो असलेली करिश्मा फॅशनपासून दूर एक सामान्य तरुणी होती. मात्र बॉलिवूडमध्ये यशाची पायरी चढत असताना तिने आपल्या लूक्समध्येही कमालीचा बदल घडवून आणला.

असे म्हटले जाते, की 'राजा हिंदूस्थानी' या सिनेमापूर्वी करिश्माने फेस लिफ्ट आणि नोज सर्जरी (Rhinoplasty) केली होती. फेस लिफ्टमध्ये चेह-याला शेप देण्यासोबतच सुरकुत्या दूर केल्या जातात. ही एक स्किन ट्रीटमेंट असते. नोज सर्जरीच्या माध्यमातून नाक लहान, मोठे, पातळ केले जाते. करिश्माने मात्र कधीच सर्जरी करुन घेतल्याचे मान्य केले नाही. मात्र तिची जुनी आणि आताची छायाचित्रे बघितली असता, तिच्या चेह-यात कमालीचा बदल झालेला दिसून येतो. सौंदर्य वाढवण्यासाठी करिश्माने मेडिकल सायन्सची मदत घेतली हे उघड आहे.
तसे पाहता, सुंदर दिसण्यासाठी प्लासिक सर्जरीची मदत घेणा-या अभिनेत्रींची यादी मोठी आहे. सर्वात सुंदर दिसण्याच्या मोहात त्या आपल्या अशा अवयवांची सर्जरी करतात ज्यामुळे त्यांच्या सौंदर्यातच आणखीच भर पडेल. अभिनेत्री आणि मॉडेल्ससाठी हा सुंदर दिसण्याचा जणू रामबाण उपाय आहे.

चला जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींविषयी ज्यांनी सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...