आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने कसे तयार झाले \'बाहुबली\'चे सीन, बघा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या गाजलेल्या \'बाहुबली: द बिगिनिंग\' या सिनेमाचा दुसरा भाग \'बाहुबली : द कन्क्लूजन\' या सिनेमाचा ट्रेलर येत्या 15 मार्चला रिलीज होतोय. हा सिनेमा 28 एप्रिल रोजी रिलीज होणारेय. सिनेमाचा पहिला भाग रिलीज होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. 10 जुलै 2015 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने देश-विदेशातील अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले होते. 120 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने एकुण 600 कोटींचा बिझनेस केला होता. हा साऊथ इंडस्ट्रीतील आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. सिनेमाच्या यशात दिग्दर्शन, कलाकारांच्या अभिनय, पटकथा, संगीतासोबतच विज्युअल इफेक्ट्सचाही मोलाचा वाटा आहे.

यांनी तयार केले VFX...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते वी. श्रीनिवास मोहन हे बाहुबलीचे व्हिज्युअल इफेक्ट्स सुपरवाइजर होते. सुमारे 2500 VFX च्या मदतीने सिनेमाला वर्ल्ड क्लास लूक मिळाला. शिवा (प्रभास) चे डोंगरावर चढणे, असो, हवेत धनुष्य चालवणे असो, किंवा हवेत झुलणे असो, हे सर्वकाही VFX च्या मदतीने शक्य झाले.

कसे काम करते VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) तंत्रज्ञान
फिल्ममेकिंगच्या काळात VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) च्या मदतीने कोणत्याही सीनला आकर्षक बनवता येते. म्हणजेच लाइव्ह शऊटदरम्यान एखाद्या छोट्याशा गोष्टीला भव्यदिव्य दाखवणे, किंवा कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन दृश्ये उभी केली जातात. या Computer Generated Imagery (CGI) असेही म्हटले जाते. यासाठी Eyeon Fusion, Autodesk Maya, Stop Motion Pro, Adobe After Effects या सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो. VFXच्या मदतीने धडापासून वेगळे झालेले शीर, लांब हात दाखवणे शक्य होते. 

divyamarathi.com आज तुम्हाला काही फोटो दाखवत आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक सामान्य सीन VFXच्या मदतीने कसा स्पेशल बनतो. 
बातम्या आणखी आहेत...