मुंबई- हॉलिवूड सिनेमांप्रमाणेच आता बॉलिवूड सिनेमांच्या सीनमध्येसुध्दा क्लिअॅरिटी टाकण्यासाठी वीएफएक्सचा वापर केला जातो. वीएफएक्स मूव्हीजमध्ये जिवंतपणा आणण्यासोबतच सीन्सना आय-कॅचिंग आणि आकर्षक बनवण्याही प्रयत्न करतात. अनेकदा वीएफएक्स वापरुन सिनेमे किंवा टीव्हीमध्ये दाखवलेले सीन इतके स्पष्ट असतात, की बघणा-यांना सर्वकाही आपल्या समोरच घडत आहे असे वाटते.
अलीकडेच रिलीज झालेल्या विजय आणि श्रीदेवी स्टारर 'पुली' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चिंबू देवेने दिग्दर्शित या सिनेमात उत्कृष्ट ग्राफिक्सचा उपयोग करण्यात आला आहे. महालापासून ते फायटिंग सीन्सपर्यंत सर्वकाही वीएफएक्सच्या मदतीने उभे करण्यात आले आहे.
आमिर खान स्टारर 'पीके' हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय या सिनेमाने केला. मात्र या सिनेमातही VFX तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का... वरील छायाचित्रात आमिरने ग्रीन क्रोमावर कसे शूटिंग केले असेल, हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर VFX च्या मदतीने हा सीन अधिक आकर्षक बनवण्यात आला.
शाहरुखचा 'चेन्नई एक्स्प्रेस' असो, वा 'रा. वन'. सलमान खानचा 'किक' असो वा 'रेडी'... बॉलिवूडच्या अधिकाधिक सिनेमांमध्ये VFX तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. साउथच्या सुपरहिट 'बाहुबली' (2015) आणि 'पुली' (2015) या सिनेमांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
कसे काम करते VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) तंत्रज्ञान
फिल्ममेकिंगच्या काळात VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) च्या मदतीने कोणत्याही सीनला आकर्षक बनवता येते. म्हणजेच लाइव्ह शऊटदरम्यान एखाद्या छोट्याशा गोष्टीला भव्यदिव्य दाखवणे, किंवा कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन दृश्ये उभी केली जातात. या Computer Generated Imagery (CGI) असेही म्हटले जाते. यासाठी Eyeon Fusion, Autodesk Maya, Stop Motion Pro, Adobe After Effects या सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो. VFXच्या मदतीने धडापासून वेगळे झालेले शीर, लांब हात दाखवणे शक्य होते.
divyamarathi.com तुम्हाला आज बॉलिवूडचे असेच काही सीन्स दाखवत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे Before आणि After Effects Photos...