आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Behind The Scene: असा शूट झाला होता रॅगिंग सीन, 200 तरुणींसमोर काढावे लागले होते कपडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः एकेकाळी बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ सिनेमाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. त्यामुळे राजकुमार हिरानी आणि आमिर खान ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. हीच जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र येत असून थ्री इडियट्स सारख्या सुपर डुपर सिनेमाच्या सिक्वेलच्या तयारीला लागलं आहे. खुद्द आमिर खाननेच ही गोष्ट मीडियासोबत शेअर केली. ‘राजू हिरानीच्या डोक्यात सिक्वेलची थीम तयार असून फायनल स्क्रिप्टची मी वाट पाहातोय.’ असे आमिर खानने सांगितले होते.

चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित या सिनेमाने तीनशे कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला होता. आमिर खान, करीना कपूर, आर. माधवन, शर्मन जोशी, बोमन इराणी आणि ओमी वैद्य या कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या सिनेमातील तुम्हाला रँगिंगचा सीन नक्कीच आठवत असेल ना. हा सीन करताना कलाकारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्याचे कारण म्हणजे गर्ल्स हॉस्टेलमध्ये तब्बल दोनशे तरुणींच्या उपस्थितीत हा सीन शूट करण्यात आला होता. एवढ्या तरुणींसोबत हा सीन करताना कलाकारांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
नेमका हा सीन कसा शूट झाला होता, हे दाखवणारा खास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या सीनच्या शूटिंगचा खास व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...