आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind The Scenes : कॅमे-यात क्लिक झाले \'बाहुबली\'चे पडद्यामागील हलके-फुलके 20 क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच्या 'बाहुबली' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. गेल्यावर्षी 10 जुलै रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि अल्पावधतीच सिनेमाने 500 कोटींपेक्षा जास्त कमाई करून आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांच्या सिनेमांना मागे टाकले. दमदार क्लायमॅक्स, उत्कृष्ट ग्राफिक्स, स्टार्सचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शनामुळे हा सिनेमा पसंत केला गेला. हा सिनेमा पूर्ण होण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागली.
आता या सिनेमाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. कटप्पाने बाहुबली का मारले? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना सिक्वेलमध्ये मिळणारेय. ‘बाहुबली 2’चे शूट एकदम जोरात सुरू आहे. या सिनेमामध्ये तुम्हाला बाहुबलीची प्रेमकथा आणि त्याचे राज्य बघायला मिळेल. दिग्दर्शक इथवरच थांबणार नसून या सिनेमाचा तिसरा भाग ‘बाहुबली 3′ देखील तुमच्या भेटीला येणार आहे. पण ही दुसर्‍या भागाची कथा नसून एक संपूर्ण नवीन सिनेमा असणार आहे. दिग्दर्शक एस. एस. राजमौली म्हणतात की, या सिनेमाचा तिसरा भाग देखील ते बनवणार आहे. पण ‘बाहुबली 3′ हा दुसर्‍या भागाची कथा पुढे नेणार नसून एक संपूर्ण नवीन सिनेमा असेल. याची कथा पूर्णपणे नवीन असेल.
आता या सिनेमाच्या सिक्वेलसाठी प्रेक्षकांना निश्चितच आणखी काही काळ वाट पाहावी लागणारेय. मात्र आम्ही बाहुबलीच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत, बाहुबलची पडद्यामागील खास क्षण, अर्थातच सिनेमाचे बिहाइंड द सीन्स. 'बाहुबली' सिनेमाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमाची शूटिंगच्या काळातील छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. हीच छायाचित्रे तुम्हाला पुढील स्लाईड्समध्ये बघता येणार आहेत. चला तर मग पुढे क्लिक करा आणि पाहा, 'बाहुबली'च्या सेटवर क्लिक झालेले खास क्षण...