आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Saiyami Kher चे 20 फोटोज बघून तुम्हीही कराल Mirziya ची अॅडव्हान्स बुकिंग!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सयामी खेर हा आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील नवा आणि फ्रेश चेहरा. हा चेहरा लवकरच झळकणारेय राकेश ओम प्रकाश मेहरांच्या आगामी 'मिर्झिया' या सिनेमात. या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून सयामीच्या चेह-यावरुन लोकांची नजर हटतच नाहीये. या सिनेमातून अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये लाँच होतोय.
सयामी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. मात्र फॅशन इंडस्ट्रीत ती प्रसिद्ध आहे. 'मिर्झिया' या सिनेमाची ऑफर मिळण्यापूर्वीच सयामीने स्वतःला ग्लॅमर दुनियेत सुपरमॉडेल म्हणून प्रस्थापित केले आहे. किंगफिशर कॅलेंडर गर्ल म्हणूनही तिची ओळख आहे. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सयामी 'रे' नावाच्या तेलगू सिनेमातसु्द्धा झळकली आहे.
मराठी घराण्यातून आहे सयामी
सयामी एका मोठ्या कुटुंबाशी जोडली गेलेली आहे. मराठी अभिनेत्री उषाकिरण यांची ही नात. अभिनेत्री तन्वी आझमी ही सयामीची आत्या तर शबाना आझमी यांना ती मावशी म्हणते. असा काहीसा मोठा आणि वळणावळणाचा वारसा घेऊन आलेली सयामी उत्कृष्ट मराठी बोलतो. सयामीला आपल्या आजीची जितकी माहिती आहे तितकीच आत्याचीही.. या दोघींनीही वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांतून आपला ठसा उमटवला. शिवाय, शबाना आझमी हे नाव समांतर आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमधलं दांडगं नाव आहे. शबाना मावशी आणि तन्वी आत्या या दोघींचाही आपल्यावर जबरदस्त पगडा असल्याचे सयामी म्हणते.
‘मिर्झिया’ ही मिर्झा साहिबा या प्रख्यात प्रेमी युगुलावर आधारित कथा आहे, असं म्हटलं तरी राकेश मेहरा यांच्या शैलीनुसार अत्यंत आधुनिक काळात ही कथा घडते. जुन्या आणि आधुनिक अशा दोन काळांत ही कथा घडते. येत्या 7 ऑक्टोबर रोजी सयामीचा पहिला बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. ‘मिर्झिया’नंतर मणीरत्नम यांच्या सिनेमात ती काम करणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, सयामी खेरची घायाळ करणारी दिलखेचक अदा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...