आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुषसोबत लग्न केल्यामुळे होत असलेल्या टीकांना सलमानच्या बहिणीने दिले सडेतोड उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयुष शर्मा आणि अर्पिता खान)
मुंबईः अभिनेता सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकली. या हायप्रोफाइल लग्नात बॉलिवूड, राजकारण, बिझनेस क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या लग्नामुळे आयुष आणि अर्पिताला मात्र टीकेला सामोरे जावे लागत आहे.
सुपरस्टार सलमान खानची बहीण असल्यामुळे अर्पिताचे लग्न लाइमलाइटमध्ये आले. काही लोकांनी या नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र अलीकडेच एका मुलाखतीत अर्पिताने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
या मुलाखतीत अर्पिताने म्हटले, "आम्हीसुद्धा सामान्य व्यक्ती आहोत. मीडियात वाईट पद्धतीने रंगवण्यात आलेल्या बातम्या वाचून दुःख होते. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी असल्यामुळे आमची लार्जर दॅन लाइफ इमेज आहे. मात्र लोक विचार न करता काहीही बोलायला लागतात."
आयुषने केवळ पैशांसाठी अर्पितासोबत लग्न केल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर लावण्यात येतोय. याविषयी अर्पिता म्हणाली, "लोक म्हणतात, की आयुषने माझ्यासोबत पैशांसाठी लग्न केले. पण हे त्यांना कसे ठाऊक? होऊ शकतं, की मी कोणत्या दुस-या कारणामुळे हे लग्न केले असावे. या फार वाईट गोष्टी आहेत. यामुळे मी दुःखी होते. लोक हे विसरले आहेत, की आयुष एका प्रसिद्ध पॉलिटिकल फॅमिलीतून आहे. ट्विटरवर लोक त्याला त्याची इनकम विचारतात. आता आम्ही लोकांसाठी आमचा इनकम टॅक्स रिटर्न्सचा फोटा इंस्टाग्रामवर तर पोस्ट करु शकत नाहीत ना."
अर्पिता पुढे म्हणाली, "मी बियॉन्सची चाहती आहे आणि तिला फॉलो करतो. एके दिवशी मी बघितले, की तिलासुद्धा अतिशय वाईट कमेंट दिल्या जातात. हे बघून मला थोडा धीर आला. कारण तिने जे यश मिळवले आहे, त्या यशावर असे लोक कमेंट करतात ज्यांचे स्वतःचे काहीच अस्तित्व नाही."
आयुष शर्मा एका समृद्ध परिवारातील असून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास उत्सुक आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष बरीच मेहनतदेखील घेतोय. अलीकडेच हे कपल मालदीवमध्ये सूटी एन्जॉय करताना दिसले. येथे हे दोघे व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. आयुष आणि अर्पिता 2013पासून रिलेशनशिपमध्ये होते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघे विवाहबद्ध झाले. आयुष सांगतो, की अर्पिता खूप केअरिंग आणि हार्डवर्किंग आहे.