आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhagyashree Reveled Why She Said No To Every Offer After Maine Pyar Kiya Became A Hit

‘मैने प्यार किया’नंतर 'या' कारणाने थांबले भाग्यश्रीचे करिअर, पहिल्यांदाच स्वतः केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री ‘मैने प्यार किया’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकली आणि पहिल्याच सिनेमातून तिने यशोशिखर गाठले. अभिनेता सलमान खानसोबत तिने करिअरची दणक्यात सुरुवात केली. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. पहिल्या सिनेमाच्या रिलीजनंतर तिच्याकडे सिनेमांची रिघ लागली. पण तिने एकामागून एक सर्वच ऑफर्स नाकारल्या. करिअरची दणक्यात सुरुवात होऊनसुद्धा भाग्यश्रीने सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला, त्यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. अचानक सिनेसृष्टीतून काढता पाय घेण्यामागचे नेमके कारण होते तरी काय, याचा खुलासा एवढ्या वर्षांनी स्वतः भाग्यश्रीने केला आहे. 48 वर्षीय भाग्यश्रीने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून यासंबंधीचा खुलासा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय भाग्यश्रीने...  
- फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये भाग्यश्रीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 
- भाग्यश्रीने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले, ''हिमालय दासानीसोबत लग्न करण्यासाठी मी स्वत:चे घर सोडले होते. कारण, हिमालयसोबतच्या नात्याला माझ्या कुटुंबियांचा विरोध होता. त्याकाळात हिमालय परदेशात शिकण्यासाठी गेला होता, तेव्हा आम्ही हे नातं तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला.'' 
- पुढे भाग्यश्री सांगते, ''त्याचवेळी ‘मैने प्यार किया’ हा सिनेमा माझ्या वाट्याला आला. हिमालय त्याचं शिक्षण करुन भारतात परतला. त्यावेळी ‘मैने प्यार किया’चे चित्रीकरण सुरु होते.'' 

15 मिनिटांत घेतला लग्नाचा निर्णय... 
- भाग्यश्रीने सांगितले, ''इतके दिवस उलटल्यानंतरही माझ्या पालकांचा विरोध मात्र काही केल्या निवळला नव्हता. त्यानंतर मी लगेचच हिमालयला फोन करुन आमच्या नात्याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आणि पुढच्या पंधरा मिनिटांमध्येच घरातून बाहेर पडत एका मंदिरात सलमान खान आणि सुरज बडजात्या यांच्यासह काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत हिमालयसोबत मी विवाहबद्ध झाले.''

पुढे वाचा, सिनेमांच्या ऑफर्स नाकारल्याची वाटत नाही खंत... 
 
बातम्या आणखी आहेत...