आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता इमरान हाश्मीला सीरिअल किसर या नावाने ओळखले जाते. त्याच्या नावी ऑनस्क्रिन किसींगचे अनेक रेकॉर्ड आहेत. पण आता त्याचे हे सर्व रेकॉर्ड मोडित निघाले आहेत. कारण किसींग सीन देण्यात भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार अरविंद अकेला कल्लू इमरानच्या खूप पुढे निघाला आहे. कल्लूने त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रब्बा इश्क ना होवे’ या चित्रपटात अभिनेत्री ऋतु सिंहला एक दोनदा नव्हे तर तब्बल 304 वेळा किस केले आहे. हा चित्रपट 17 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे.
या चित्रपटात कल्लू अनेक रुपात दिसला आहे. सुरुवातीला तो चित्रपटा ब्रह्मचारी तरुणाच्या भूमिकेत झळकतो, जो महिलांपासून दूर पळत असतो. मात्र ऋतू सिंहच्या एन्ट्रीनंतर त्याचा प्रेमावर विश्वास बसतो. या चित्रपटात कल्लूने किसींगचा नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
विशेष म्हणजे समीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढे किसींग सीन इतर कुठल्याही भोजपुरी चित्रपटात यापूर्वी कधीही बघायला मिळालेले नाहीत. या चित्रपटात कल्ली आणि ऋतू सिंह यांच्यावर चित्रीत झालेले किसींग सिक्वेन्स पडद्यावर व्हल्गर वाटत नसल्याचे समीक्षकांचे मत आहे. प्रेक्षकांना दोघांनी केमिस्ट्री पसंत पडली आहे. भोजपुरी प्रेक्षकांनी आता कल्लूला भोजपुरी चित्रपटांचा इमरान हाश्मी हे नाव दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.