Home »Gossip» Bhojpuri Actor Ravi Kishan Birthday

एकेकाळी मुंबईतील चाळीमध्ये राहायचा हा अभिनेता, आज आहे भोजपुरी सुपरस्टार

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 00:08 AM IST

मुंबई - अनेक हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता रवी किशन आज 47 वर्षाचा झाला आहे. अनेक हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता रवी किशन आज भोजपुरी चित्रपटाचा स्टार म्हणून ओळखला जातो. एकेकाळी मुंबईच्या चाळीत राहणारा रवी आज यशाची अनेक शिखरे गाठत आहे. भोजपुरी तसेच हिंदी चित्रपटातही त्याला वेगळा असा चाहतावर्ग आहे.
वडिलांना पसंत नव्हते चित्रपटात काम करणे
रवी किशनला लहानपणापासूनच अभिनयात रुची होती पण त्याच्या वडिलांना त्याने अभिनय करणे अजिबात पसंत नव्हते. रवी किशनने एकदा रामलीलामध्ये स्त्रीपात्राची भूमिका केली होती यावरुन आणि अनेकदा रवीने वडिलांच्या हातचा मार खाल्ला.
500 रुपये देऊन आईने पळून जाण्यास सांगितले..
केवळ 17 वर्षाचा असताना वडिलांनी नाटकात काम केल्याने रवीने वडिलांचा फार मार खाल्ला. यावेळी आईने रवीला 500 रुपये दिले आणि पळून जाण्यास सांगितले. तेव्हा रवी पळून गेला आणि त्याचा मित्र हृदय शेट्टीला भेटला. त्याने रवीला काही फिल्ममेकरबरोबर ओळख करुन दिली आणि मग रवीला पितांबर या बी ग्रेड चित्रपटात भूमिका मिळाली.
पहिली कमाई होती 5000 रुपये
रवीला या पहिल्या चित्रपटात काम केल्यासाठी 5000 रुपये मिळाले होते. त्या पैशांमधून रवीने बाईक खरेदी केली आणि त्याचा संघर्ष सुरु झाला.
'तेरे नाम' नंतर मिळाली ओळख
रवी किशनने 'तेरे नाम' या चित्रपटात एका पंडीतची भूमिका केली होती. या भूमिकेनंतर त्याला ओळख मिळाली.
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या रवी किशनची लाईफस्टोरी आणि त्याबद्दलच्या काही खास गोष्टी..

Next Article

Recommended