पटनाः पाकिस्तानातील दहशतवाद्यांनाविरोधात भारताच्या वतीने झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बॉलिवूडमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही बॉलिवूड कलाकार पाक कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाठिंबा दर्शवत आहेत, तर काही त्यांना विरोध करत आहेत. यातच भोजपुरी इंडस्ट्रीतील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचे पाकिस्तानसोबत एक खास कनेक्शन आहे. जाणून घेऊयात पाकिस्तानसोबत काय आहे यांचे नाते...
- भोजपुरी इंडस्ट्रीत पाकिस्तान नावाचा उल्लेख असलेले अनेक सिनेमे बनले आहेत. सिनेमाच्या शीर्षकात पाकिस्तानचा उल्लेख असलेले सिनेमे भोजपुरीत रिलीज झाले आणि त्यांनी चांगली कमाई केली आहे.
- भोजपुरी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी या सिनेमांमध्ये काम केले आहे.
- या सिनेमात काम करणा-या अभिनेत्रींना भोजपुरी प्रेक्षकांनी पसंत केले आहेत.
हे आहेत पाकिस्तान नावाचा उल्लेख असलेले सिनेमे...
- 2015 पासून हा ट्रेंड सुरु झाला. या ट्रेंडचे नाव होते भोजपुरी सिनेमांचे पाकिस्तान कनेक्शन.
- 2015 मध्ये पहिला सिनेमा आला, त्याचे नाव होते 'पटना से पाकिस्तान'. या सिनेमात भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ सोबत आम्रपाली आणि काजल राघवानी या मेन लीडमध्ये होत्या.
- त्याच्या वर्षभराने म्हणजे 2016 मध्ये आणखी एक सिनेमा रिलीज झाला, त्याचे नाव होते 'ले आईब दुल्हनिया पाकिस्तान से'. या सिनेमात विशाल सिंह आणि तनुश्री ही जोडी झळकली होती.
- पाक कनेक्शन असलेल्या 'इलाहाबाद से इस्लामाबाद' या सिनेमात राणी चॅटर्जी आणि प्रियांका पंडीत या अभिनेत्री होत्या.
- 'तिरंगा पाकिस्तान में' हा सिनेमासुद्धा पाक कनेक्शन असलेला सिनेमा होता. यामध्ये नेहाश्री ही अॅक्ट्रेस मेन लीडमध्ये होती.
- पाकिस्तान कनेक्शन असलेला आणखी एक भोजपुरी सिनेमा होता, त्याचे नाव होते 'दुल्हन चाही पाकिस्तान से'. या सिनेमात तनुश्री आणि शुभी शर्मा या अभिनेत्री होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, पाकिस्तान कनेक्शन असलेल्या हीरोईन्सविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)