आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK विरोधात चित्रपट बनवण्यात बॉलिवूड नव्हे भोजपुरी इंडस्ट्री आहे आघाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटनाः गेल्या वर्षभरात भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत देशभक्तीचा नवीन ट्रेंड समोर आला आहे. येथे पाकिस्तानच्या विरोधात बॉलिवूडच्या तुलनेत अधिक सिनेमे तयार होत आहेत. वर्षभरात असे आठ भोजपुरी चित्रपट रिलीज झाले आहेत. हे सर्व चित्रपट पाकिस्तानच्या विरोधात भाष्य करणारे असून ते हिट ठरले आहेत. बॉक्स ऑफिसवर या सर्व चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी 'इंडिया v/s पाकिस्तान' हा भोजपुरी चित्रपट रिलीज झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता 'बॉर्डर पाकिस्तान'...
- काही दिवसांपूर्वीच दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ स्टारर 'बॉर्डर पाकिस्तान' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता.
- वर्षभरात येथे 'पटना से पाकिस्तान', 'इलाहाबाद से इस्लामाबाद', 'पाकिस्तान में जय श्री राम', 'ले आईब दुल्हनिया पाकिस्तान से' आणि 'दुल्हन चाही पाकिस्तान से', असे एकुण आठ चित्रपट रिलीज झाले आहेत.

कशी झाली सुरुवात...
- भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत यापूर्वी देशभक्तीवर आधारित फारसे चित्रपट तयार झाले नव्हते. पूर्वी मसाला चित्रपटच अधिक बनवले जायचे. 
- भोजपुरीमध्ये दिग्दर्शक संतोष मिश्रा यांनी देशभक्तीपर चित्रपटांना सुरुवात केली. त्यांनी 'पटना से पाकिस्तान' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर 'ले आइब दुल्हनिया पाकिस्तान से' हा चित्रपट आला. पवन सिंहचा  'गद्दर 2' आणि 'सत्या' हे दोन चित्रपटदेखील चांगले चालले. 

इंडस्ट्रीचे फायदे...
- भोजपुरी चित्रपट निर्मिती खर्चापेक्षा कितीतरी पटीने नफा कमवत असतात. असे चित्रपट तयार करण्यासाठी फेमस अॅक्टर किंवा अॅक्ट्रेसची गरज नसते. 
- केवळ देशभक्तीच्या नावावर हे चित्रपट चालतात. नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना मानधनसुद्धा कमी द्यावे लागते. याच कारणामुळे अनेक गायक पाकिस्तानच्या विरोधात गाणी गाऊन लाखोंची कमाई करतात. दरवर्षी पाकिस्तानच्या विरोधातील गाणी असलेले शेकडो अल्बम मार्केटमध्ये येत असतात.  

पुढील स्लाईड्सवर बघा, पाकिस्तानाच्या विरोधात तयार झालेल्या भोजपुरी चित्रपटांचे खास पोस्टर्स..
बातम्या आणखी आहेत...