आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी या अॅक्टरकडे खायलाही नव्हते पैसे, आज आहे भोजपूरी इंडस्ट्रीचा Superstar

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी प्रीतीसोबत आणि (R) वडील श्यामनारायण शुक्लासोबत रवी किशन - Divya Marathi
पत्नी प्रीतीसोबत आणि (R) वडील श्यामनारायण शुक्लासोबत रवी किशन
मुंबई/पटना: भोजपूरी सिनेसृष्टीचा सुपरस्टार रवी किशनकडे आज पैशाला कमी नाही, मात्र एक काळ असा होता, जेव्हा त्याच्याकडे खायलासुद्धा पैसे नसायचे. एका मुलाखतीत स्वतः रवी किशनने हा खुलासा केला. रवी किशन म्हणाला, 1990 साली मी जेव्हा गाव सोडून मुंबईत दाखल झालो, तेव्हा माझ्याकडे खायला पैसे आणि डोक्यावर छत नव्हते. दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी हाती येईल ते काम मी केले. काम मिळाले, तर पोटभर जेवायचो अन्यथा उपाशी पोटी रात्र काढावी लागायची. 

गावात नाटकांमध्ये साकारायचा स्त्री पात्र...
- रवी किशनने सांगितले, की त्याला बालपणापासूनच अभिनयात रुची होती. गावात नाटकात काम करण्याची एकही संधी तो गमावत नसे. गावात जेव्हाही नाटक व्हायचे, तेव्हा त्याची एक भूमिका ठरलेली असायची. त्याने या नाटकांमध्ये स्त्री पात्र अधिक साकारले.  
- रवी किशनचे संपूर्ण नाव रवी किशन शुक्ला आहे. 17 जुलै 1969 रोजी जौनपूरच्या बिसुईं या एका छोट्या गावात जन्मलेल्या रवीच्या पत्नीचे नाव प्रीती आहे. या दाम्पत्याला एकुण चार मुले आहेत. रेवा, तनिष्क आणि इशिता ही त्यांच्या तीन मुलींची तर सक्षम हे मुलाचे नाव आहे.
 
जेव्हा आई म्हणाली, बेटा जीव वाचव आणि येथून पळून जा... 
- रवी सांगितले, गावात कधीकधी त्याला रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारावी लागायची. त्याच्या वडिलांना त्याचे स्त्री पात्र साकारणे पसंत नव्हते. वडिलांची इच्छा होती, की त्यांच्या मुलाने नाटकात काम न करता शिक्षणाकडे लक्ष द्यावे. 
- मुलगा नालायक झाला, असे त्याच्या वडिलांना वाटायचे. त्यांचा मुलगा घराण्याच्या नावाला कलंक लावत असल्याचा त्यांचा समज झाला होता. 
- त्यामुळे रवी किशनला नेहमी त्याच्या वडिलांच्या हातचा मार खावा लागायचा. एकेदिवशी रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी त्याला बेदम मारहाण केली होती. 
- आईने मध्यस्थी करुन रवी किशनला वडिलांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर आई म्हणाली, की स्वतःचा जीव वाचव आणि येथून पळून जा. आईचे म्हणणे ऐकून रवी किशनने घर सोडले आणि तो मुंबईत पोहोचला.
 
पुढील स्लाईडमध्ये वाचा... रवी किशन कसा बनला फिल्म स्टार...  
बातम्या आणखी आहेत...