आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 HOT गर्ल्समधून झाली हिची निवड, लॉयर फॅमिलीमध्ये झालीये लहानाची मोठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्या चौकसे - Divya Marathi
दिव्या चौकसे
भोपाळ: बॉलिवूडमध्ये भोपाळमधून आणखी एक अभिनेत्री पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या शहरातील वकील कुटुंबातील दिव्या चौकसे 6 ऑगस्टला अभिनेता जॉय मुखर्जीचा मुलगा मोंजोय मुखर्जीच्या डेब्यू दिग्दर्शित 'है अपना दिल आवारा' सिनेमातून अभिनयात एंट्री करणार आहे. दिव्याचे वडील मोहन चौकसे आणि बहीण पल्लवी चौकसेसुध्दा वकील आहेत.
बालपणीपासूनच खट्याळ, हटके अंदाजात जगणारी दिव्याला अभिनयात, गायनात आणि रुपेरी पडद्यावर स्वत:ला पाहायचे होते. दिव्याने भोपाळच्या केंद्रीय विद्यालय-1 मधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्लीमधून मास-कम्युनिकेशनमध्ये पदवी शिक्षण केले. ग्लॅमरच्या ओढीने ती यूकेला गेली. यूकेच्या बेडफोर्डशायर यूनिव्हर्सिटीमधून तिने सिनेमा निर्मितीचे शिक्षण घेतले. ती आयएमशी मिस इंडिया यूनिव्हर्सलासुद्धा स्पर्धक होती. डझनभर प्रिंट, व्हिडिओ, कमर्शिअल जाहिरातींमध्ये काम केलेली दिव्या कथक, बॉलरुम आणि सालसा डान्सरसुध्दा आहे.
मी हॉट लॉयर आहे...
दिव्या चौकसे म्हणाली, 'मी माझ्या डेब्यू सिनेमासाठी खूप उत्साही आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले आहे. माझे संपूर्ण कुटुंबीय लॉयर आहेत. लॉ अॅक्ट बालपणीपासून ऐकत आले आहे. मला यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मी थिएटर वर्कशॉप, डान्सचे वेगवेगळे फार्म शिकले, संगीतही शिकले. मॉडेलिंग केले.' दिव्या पुढे म्हणाली, 'जर मी लॉमध्ये करिअर केले असते, तर मी हॉट लॉयर झाले असते. कोर्टात जाताच सर्व क्लाइंट आणि सर्व केस माझ्याकडे आले असते.'
28 हॉट तरुणींमधून निवडली...
दिव्याने सांगितले, की 'अपना दिल तो आवारा' सिनेमात सान्या दलवानीच्या भूमिकेसाठी मी 28 हॉट, टॅलेंटेड तरुणींमधून निवडल्या गेली.
रिलेशनशिपवर बनला सिनेमा...
मी या सिनेमात एका बिझनेसमन सान्या दलवानीची भूमिका साकारत आहे. ती हॉट क्लासी डिझाइनर आहे. ती घर चालवते, नव-याला पॉकेट मनी देते. तिच्या पतीला तिच्या संशय येतो. हा सिनेमा दोन विवाहित आणि एका अविवाहितमधील नात्यावर आहे.
माझ्या को-स्टारची इच्छा होती, मी हे पात्र चांगले करू नये...
माझ्या सिनेमाचा को-स्टार विक्रम कोचरसोबत माझे कधीच पटले नाही. त्याची इच्छा होती, की मी हे पात्र करून नये. आमचे शूटिंग सेटवर खूप भांडण व्हायचे. त्याला वाटायचे, मी हा अभिनय करूच शकणार नाही.
बर्फाने खूप मारले...
मी शूटिंगवेळी खूप धमाल मस्ती केली. शूटिंगमध्ये खूप बर्फ खेळले आणि लोकांना मारले. खूप ओरडही बसायचे. परंतु मोंजोय यांच्यासोबत हे शूटिंग खूप एन्जॉय केले.
फायनल होताच डिस्क्लोज करेल...
भोपाळमध्ये माझी आई, वडील आणि बहीण आहेत. भाऊ न्यूझिलँडमध्ये शिकतोय. मी नुकतेच एक गाणे लिहिले. त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. सोबतच एक वेबसीरिजसाठी काम करतेय. सोबतच काही मोठ्या प्रोजेक्ट्सवर बातचीत चालू आहे. फायनल होताच डिस्क्लोज करेल.
कॅमे-यासमोर आली नाही अडचण...
मी दिग्दर्शन शिकले आहे. ते मला कॅमे-यासमोर अभिनयासाठी कामात आले. लाइट, अँगल या सर्व गोष्टी एक चांगल्या कलाकाराला अभिनयासह जाणून घेणे अवश्यक आहे. म्हणून मला कॅमे-यासोबत काहीच अडचण आली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्या चौकसेचे ग्लॅमरस अदा...
बातम्या आणखी आहेत...