आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमीच्या नकळत झाले होते ऑडिशन, आता स्लीम अवतारात दिसणार नवीन चित्रपटात..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'दम लगाके हईशा' सिनेमातील हिरोईन म्हणजे भूमी पेडणेकरचा सध्याचा लूक पाहून कोणीही म्हणू शकणार नाही की ती भूमी आहे. सिनेमात ओव्हरवेट दिसणारी भूमी आता लठ्ठ 
नाही तर अगदी स्लिमट्रीम झाली आहे. भूमी आता नवीन चित्रपट 'शुभमंगल सावधान' द्वारे पुन्हा आयुष्यमानसोबत झळकणार आहे.  
 
भूमीने एका मुलाखतीत सांगितले होते की ती प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होती आणि त्यावेळी तिला ऑडिशनसाठी तयारी करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी तिला वाटले, की ऑडिशनसाठी येणाऱ्या मुलींसाठी डेमो म्हणून तिला तयारी करण्यास सांगितले आहे. पण नंतर भूमीला या चित्रपटासाठी निवड झाल्याचे सांगितले. भूमीसाठी हा एक सुखद आणि अनपेक्षित धक्का होता.   
 
30 किलो वजन घटवले

'दम लगा के हईशा'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या भूमी पेडणेकरचे एकेकाळी वजन हे तब्बल 85 किलो होते. आता मात्र तिने 30 किलो वजन कमी केले आहे. सिनेमासाठी तिने 
हे वजन वाढवले होते. स्ट्रीक्ट डाएटद्वारे भूमीने हे वजन कमी केले आहेत. भूमीच्या मते, फिट टू फॅट बनण्यासाठी तिने हे डाएट फॉलो केले. त्यात रिफाइंड शुगर, सॅच्युरेटेड फॅट्स, गहू आणि चीज यांचा आहारात समावेश नव्हता. जेवणात नट्स, बाजरी, ब्राउन राइस आणि प्रोटीन्स असायचे.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, भूमीच्या बदलेल्या लूकचे आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...