आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तेरे नाम' गर्ल करत आहे कमबॅक, जाणून घ्या आता कुठे आहेत सलमानच्या या 9 हिरोईन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानसोबत 'तेरे नाम' या सिनेमाद्वारे डेब्यू करणारी भूमिका चावला गेल्या नऊ वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. 21 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या भूमिकाने 'तेरे नाम' या सिनेमात निर्जराची भूमिका साकारुन प्रसिद्धी मिळवली होती. 2007 मध्ये आलेल्या 'गांधी माय फादर' या सिनेमात ती शेवटची दिसली होती.

धोनीच्या बहिणीच्या रुपात करतेय कमबॅक...
भूमिकाने तेरे नाम या सिनेमानंतर 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिले', 'दिल जो भी करे' या सिनेमांमध्ये काम केले. मात्र तिचे करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. त्यानंतर तिने सिनेसृष्टीकडे पाठ फिरवली. योगा गुरु भरत ठाकूरसोबत भूमिकाचे लग्न झाले आहे. आता ब-याच वर्षांनी भूमिका बॉलिवूडमध्ये आपल्या सेकंड इनिंगला सुरुवात करणारेय. सुशांत सिंह राजपूत स्टारर 'एम एस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात भूमिका धोनीच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणारेय. नीरज पांडे दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 30 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय

भूमिका चावलाव्यतिरिक्त सलमान खानसोबत इंडस्ट्रीत डेब्यू करणा-या इतर अभिनेत्री आता कुठे आहेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...