(अभिनेत्री भूमिका चावला)
अभिनेत्री भूमिका चावलाचा आज (21 ऑगस्ट) 37वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांत केलेली भूमिका दक्षिणात्य इंडस्ट्रीची प्रसिध्द अभिनेत्री आहे. भूमिकाचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी नवी दिल्लीच्या पंजाब कुटुंबात झाला. दिल्लीमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भूमिकाने 1997मध्ये करिअर घडवण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल ठेवले. हळू-हळू तिला जाहिराती आणि म्यूझिक अल्बममध्ये काम करण्यासाठी संधी मिळाली. फेअर अँड लव्हली, डाबर लाल तेलसारख्या प्रोडक्टच्या जाहिराती केल्यानंतर तिला अदनाम सामी आणि उदित नारायणसारख्या सिंगर्सच्या उल्बममध्ये गाण्याची संधी मिळाली.
जाहिरातीतून मिळालेली लोकप्रियतेमुळे तिला तेलगू सिनेमांत काम करण्याची संधी चालून आली. तिने 2000मध्ये 'युवाकुडु' या तेलगू सिनेमात काम केले. 'खुशी' सिनेमासाठी भूमिकाला उत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
दक्षिण इंडस्ट्रीमध्ये 9 सिनेमे केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 2003मध्ये तिने सलमान खानसोबत 'तेरे नाम' सिनेमात काम केले. सिनेमातील भूमिका आणि सलमानची जोडी सर्वांना पसंत पडली. या सिनेमाच्या यशानंतर तिने 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिले', 'दिल जो भी कहे', 'फॅमिली', 'गांधी माय फादर' सारख्या बॉलिवू़ड सिनेमांत काम केले. परंतु हे सर्व सिनेमा फ्लॉप ठरले. सिनेमांच्या अपयशासोबत भूमिकाचे बॉलिवूडमधील करिअरसुध्दा संपुष्टात आले. मात्र साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिचा दबदबा आजसुध्दा कायम आहे.
दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूड सिनेमांत काम केले, त्यातील अनेकींना यश मिळाले मात्र अनेक अभिनेत्री फ्लॉप ठरल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अशाच अभिनेत्रींविषयी...