आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग गुरुसोबत लग्न करून सोडले होते बॉलिवूड, तब्बल 8 वर्षांनंतर करतेय पुनरागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूमिका चावला
2003मध्ये सलमान खानसोबत अपोझिट 'तेरे नाम' सिनेमातून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री भूमिका चावला सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. परंतु आता बातमी आहे, की ती पुढील वर्षी रिलीज होणा-या 'एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या बायोपिकमधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे.
सुशांस सिंह राजपूत स्टारर या सिनेमात भूमिका एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. मात्र अद्याप तिच्या भूमिकेविषयी काहीच खुलासा झालेला नाहीये. परंतु तिची भूमिका महत्वाची असेल असे बोलले जात आहे.
दक्षिणची आघाडीची अभिनेत्री-
बॉलिवू़डमध्ये अनेक सिनेमांत काम केलेली 37 वर्षीय भूमिका दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील यशस्वी अभिनेत्री आहे. भूमिकाचा जन्म 21 ऑगस्ट 1978ला नवी दिल्लीला पंजाबी कुटुंबात झाला. तिचे वडील ए. एस. चावला आर्मी ऑफिसर आणि आई बाली चावला शिक्षिका आहे.
दिल्लीमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भूमिका 1997मध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला आली. हळू-हळू तिला जाहिराती आणि हिंदी म्यूझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. फेअर अँड लव्हली, डाबर लाल तेलसारख्या प्रॉडक्टच्या जाहिराती केल्यानंतर तिने अदनान सामी आणि उदित नारायणसारख्या गायकांच्या अल्बममध्ये गाण्याची ऑफर मिळाली. जाहिरातीतून मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तिने तेलगू सिनेमांत काम करण्याची संधी चालून आली. तिने 2000मध्ये 'युवाकुडु' या तेलगू सिनेमात काम केले. 'खुशी' सिनेमासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
बॉलिवूडमध्ये झाली फ्लॉप-
दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये 9 सिनेमे केल्यानंतर तिने बॉलिवू़डमध्ये पाऊल ठेवले. 2003मध्ये तिने सलमानसोबत 'तेरे नाम' सिनेमात काम केले. तिने सिनेमात निर्जराची भूमिका साकारली होती. सलमानसोबतची तिची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. सिनेमाच्या यशानंतर तिने 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिले', 'दिल जो भी कहे', 'फॅमिली', 'गांधी माय फादर'सारख्या सिनेमांत काम केले. परंतु हे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. सिनेमाच्या अपयशाने भूमिकाचे बॉलिवू़डमधील करिअर संपुष्टात आले. मात्र दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिचा दबदबा कायम राहिला.
योग गुरुसोबत केले लग्न-
बॉलिवू़डमध्ये मिळालेल्या अपयशानंतर भूमिकाने बॉयफ्रेंड आणि योग गुरु भरत ठाकुरसोबत लग्न केले. दोघांनी अनेक दिवस एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्नगाठीत अडकले. दोघांना एक मुलगादेखील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भूमिकाचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...