आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांची झाली आराध्या बच्चन, जगते लग्झरी लाइफ, गिफ्टमध्ये मिळाली आहे BMW

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या बच्चन आता 4 वर्षांची झाली आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लाडक्या लेकीचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत झाला.
आराध्या जन्मापासूनच मीडियात चर्चेत आहे. तिची एक झलक कॅमे-यात क्लिक करण्यासाठी फोटोग्राफर्स उत्सुक असतात. आपल्या आईवडिलांसोबत ती नेहमी इव्हेंट्समध्ये दिसत असते. आराध्या आपल्या आजोबांची सर्वात लाडकी आहे. म्हणूनच तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिचे आजोबा महानायक अमिताभ बच्चन यांनी तिला BMW कार गिफ्ट म्हणून दिली होती.
आराध्याचे लग्झरी आयुष्य
चार वर्षांची आराध्या लग्झरी आयुष्य जगते. ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. बच्चन कुटुंबाचे आवडते फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला तिच्यासाठी ड्रेसेस डिझाइन करतात. आराध्या विलो बॉम्बरचे जॅकेट आणि यूजीजीचे बूट घालते. भारतात यूजीजीच्या बुटांची किंमत जवळजवळ दहा हजारांपासून सुरु होते. आराध्या अनेकदा पिंक ड्रेसमध्ये दिसते. तिच्या ड्रेसेसची निवड आई आराध्या करत असते.
आराध्याप्रमाणे असे अनेक सेलिब्रिटी किड्स आहेत, जे महागड्या वस्तू, ब्रॅण्डेट कपडे, खेळणी, गॅजेट, डॉल्ससोबत आलिशान आयुष्य जगत आहेत. एक नजर टाकुया अशा काही सेलिब्रिटी किड्सवर जे कमी वयातच लग्झरी आयुष्य जगत आहेत...
पुढील स्लाईड्वर क्लिक करा आणि जाणून घ्या स्टार किड्सच्या लग्झरी आयुष्याविषयी...