आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Birthday Special : Big B Worked In Blacker & Co. Pvt Ltd In Kolkata

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Exclusive: जया नव्हे बिग बींना मराठी मुलीशी करायचे होते लग्न, नकार दिल्याने सोडली नोकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभने 26 डिसेंबर 1968 ला ब्लॅकर अँड कंपनीमधून राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांचा पगार जवळपास 1500 रुपये होता. पण त्यांना 30 नोव्हेंबर 1968 पर्यंतच पगार देण्यात आला होता. - Divya Marathi
अमिताभने 26 डिसेंबर 1968 ला ब्लॅकर अँड कंपनीमधून राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांचा पगार जवळपास 1500 रुपये होता. पण त्यांना 30 नोव्हेंबर 1968 पर्यंतच पगार देण्यात आला होता.
कोलकाता - अमिताभ बच्चन यांचे पहिले प्रेम जया बच्चन किंवा रेखा नाही, तर ब्रिटीश कंपनी ICI मध्ये काम करणारी एक महाराष्ट्रीयन मराठी मुलगी चंद्रा (नाव बदललेले) होती. दोघे कोलकात्यात नोकरी करत होते. बिग बींना तिच्याशीच विवाहदेखिल करायचा होता. पण ते शक्य झाले नाही त्यामुळे बिग बी नोकरी आणि कोलकाता दोन्ही सोडून मुंबईला आले होते. त्यावेळी अमिताभचा 26 दिवसांचा पगारही कापण्यात आला होता. अमिताभबरोबर ब्लॅकर अँड कंपनीमध्ये तीन वर्षे काम करणारे त्याचे मित्र दिनेश कुमार यांनी हा दावा केला आहे. अमिताभच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचा, रोहिताश्व मिश्राचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट..

अमिताभ बच्चन उद्या वाढदिवस साजरा करत आहेत. 74 वर्षांमध्ये बिग बींच्या जीवनातील प्रत्येक पैलूबाबत बरेच काही समोर आले आहे. पण साठच्या दशकात नोकरीसाठी कोलकात्यात राहण्याचा किस्सा फार लोकांना माहिती नाही. बिग बींच्या त्या 7 वर्षांतील काही रंजक माहिती आम्ही या निमित्ताने वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. अमिताभ यांचे त्या काळातील ऑफिस कलिग्स, रूम मेट, घराचा वॉचमॅन आणि नीकटवर्तींची भेट घेऊन ही माहिती गोळा करण्यात आली आहे.

तीन वर्षे सोबत काम केलेल्या मित्राचा खुलासा..
- ब्लैकर एंड कंपनीत अमिताभ यांच्याबरोबर काम करणारे दिनेश कुमार अजूनही कोलकात्यातच राहतात. त्यांनी 3 वर्षे सोबत काम केले होते.
- दिनेश यांनी सांगितले की, दुसऱ्या ब्रिटीश कंपनीत काम करणारी चंद्रा आधी अमिताभबरोबर लग्नासाठी तयार होती. पण नंतर तिने नकार दिला. बरेच समजावल्यानंतरही ते शक्य झाले नाही.
- त्यानंतर काही दिवसांनी चंद्रा ब्रिटिश रेल्वेत काम करणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीबरोबर वर्ल्ड टूरवर निघून गेली. परत आल्यानंतर अमिताभ यांनी तिला लग्नासाठी विचारले तेव्हा तिने नकार दिला.
- दिनेश यांच्या मते अमिताभ यांनी नोकरी आणि कोलकाता सोडण्यामागचे एक मोठे कारण हा धक्का हे होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, बिग बींच्या या नोकरीतील आणखी काही खास किस्से...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...