आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 11: 'भाभीजी' आणि 'अक्षरा' मध्ये झाली कॅटफाइट, लक्झरी टास्कमध्ये जिंकले शेजारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-11' च्या चौथ्या एपिसोडमध्ये कंटेस्टंटमध्ये लक्झरी टास्कसाठी विविध टास्क झाले. तर शोमध्ये पुन्हा एकदा भांडणाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रोड्युसर विकास गुप्ता आणि भाभीजी म्हणजेच शिल्पा शिंदे यांचे तर जुनेच भांडण आहे, ते संपण्याची काहीही चिन्हं नाहीत. त्यात आता या भांडणामध्ये हिना खानने उडी घेतली आहे. 

'भाभीजी' आणि 'अक्षरा'मध्ये कॅट फाइट.. 
- 'बिग बॉस'च्या चौथ्या एपिसोडमध्ये टीव्हीवरील दोन फेमस सेलिब्रिटी शिल्पा आणि हिना खान यांच्यात वाद पाहायला मिळाला. त्या वादाचे कारण ठरला विकास. 
- हिना स्टोर रूममध्ये जाऊन शिल्पाला हे म्हणताना दिसली की, आता तिच्या आणि विकासच्या भांडणात कोणीही मधे पडणार नाही. त्यांनी आता स्वतःच त्यांचे भांडण निपटावे. 
- त्यावर शिल्पा म्हणाली की, तिने कधी या प्रकरणात कोणाला मधे पडण्यास सांगितलेही नाही. तसेच ती असेही म्हणाली की, तिला काही करायचे असेल तर कोणी अडवूही शकणार नाही. 
- त्यावर हिना म्हणाली की, तिला काही चूक आहे असे वाटले तर ती स्टँड घेईल. त्यावरूनच दोघींमध्ये वाड झाला आणि त्या एकमेकिंशी भांडू लागल्या. आखेर शिल्पाने असे म्हणत विषय संपवला की, तिला अशा नॉनसेन्स लोकांशी बोलायचेच नाही. 
- प्रिमियरच्यावेळी जेव्हा शिल्पा आणि हिना शोमध्ये आल्या होत्या तेव्हा दोघींनी एकमेकांना हग करत वेलकम केले होते. 

टास्कमध्ये जखमी झाली हिना.. 
- टास्कच्या पहिल्या राऊंडमध्ये ज्योती कुमारी, प्रियांक शर्मा आणि सपना चौधरी यांनी पार्टिसिपेट केले. या तिघांना एका पोपटाबरोबर बोलून त्याला आपल्यासारखे बोलायला लावायचे होते. त्यात तिघे अपयशी ठरले. 
- दुसऱ्या टास्कमघ्ये हिना खान, पुनीष शर्मा आणि अर्शी खान यांना काही कोंबड्या पकडायच्या होत्या. 
- त्यावेळी हिनाच्या डोळ्यावर पट्टी होती. पुनीश आणि अर्शी सांगेल त्या मार्गाने जात तिला कोंबडी पकडून कुंपनात टाकायच्या होत्या. 
- टास्कमध्ये हिना खाली पडली आणि तिच्या पायाला थोडी जखमही झाली. 

शेजारी जिंकले लक्झरी टास्क 
- लक्झरी टास्कमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये हितेन तेजवानी, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांनी भाग घेतला. 
- यात हितेन आणि विकासने चांगली कामगिरी केली पण शिल्पाने टास्कच केले नाही. 
- त्यामुळे हा टास्क कंटेस्टंट्स हारले. फायनल रिझल्टनुसार शेजारी स्पर्धक टास्क जिंकले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'बिग बॉस' च्या लक्झरी टास्क आणि हिना-शिल्पाच्या वादाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...