Home »Gossip» Bigg Boss Ex Contestant Mink Brar Worked In Porn Industry

बिग बॉसची EX स्पर्धक आता करते पोर्न इंडस्ट्रीत काम, लेस्बियन असल्याची दिली आहे कबुली

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 16:28 PM IST


मुंबई: बिग बॉसच्या सहाव्या पर्वात झळकलेली अभिनेत्री मिंक ब्रार नेहमीच चर्चेत असते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिंक अमेरिकेतील फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव असून, ही फिल्म इंडस्ट्री पोर्न इंडस्ट्रीपेक्षा वेगळी नाही. मिंक आता पोर्न इंडस्ट्रीत काम करत असल्याने तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही धक्कादायक बातमी असावी.

देवानंद यांनी आणले होते फिल्म इंडस्ट्रीत...
4 नोव्हेंबर 1980 रोजी पंजाबी कुटुंबात मिंकचा जन्म झाला. तिचे बालपण जर्मनीत गेले. वयाच्या 13व्या वर्षी मिंकचे फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण झाले होते. अभिनेते देवानंद यांनी तिला 'प्यार का तराना' या चित्रपटात साइन केले होते. 1993 साली तिचा हा पहिला चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर मिंकने जंग (1996) सात रंग के सपने (1998), यमराज (1998), हम आपके दिल में रहते हैं (1999), गंगा की कसम (1999), ज्वालामुखी (2000), अजनबी (2001), जहरिला (2001), पिताहा (2002), चलो इश्क लडाए (2002), बॉर्डर हिंदूस्तान का (2003), उप्स (2003) या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
मिंकला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळू शकले नाही. त्यामुळे तिने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला होता. डान्सिंग क्वीन, जोर का झटका या टीव्ही शोजमध्ये झळकली. तिला छोट्या पडद्यावर खरी ओळख मिळाली ती बिग बॉस या शोमध्ये. या शोच्या सहाव्या पर्वात मिंकची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.

वादाशी आहे जुने नाते...
काही दिवसांपूर्वीच मिंक विमानतळावर कस्टम अधिका-यांसोबत गैरवर्तन केल्यामुळे चर्चेत आली होती. इतकेच नाही तर मिंक लेस्बियन आहे. स्वतः तिने याची कबुली दिली होती. विशेष म्हणजे एकदा स्वीमिंग पूलमध्ये ती एका महिलेला किस करतानासुद्धा आढळली होती. अनेक पार्टीजमध्येसुद्धा ती महिलांसोबत स्मूच करताना आढळली आहे. मी लेस्बियन असल्याचे माझ्या आईला ठाऊक असल्याचे मिंकने एका मुलाखतीत सांगितले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, मिंकचे Latest Photos...

Next Article

Recommended