आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Bigg Boss\' चे मोठे वाद, कुठे खुल्लमखुल्ला Kiss तर कधी प्रेग्नंसीच्या बातम्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या 8व्या सीझनमधील दृश्यात डिआंड्रा सॉरेस आणि गौतम गुलाटी.
मुंबई - बिग बॉसचा दहावा सीझन लवकरच सुरू होत आहे. त्यासाठीचे प्रोमो झळकायला लागले आहेत. या सीझनमध्ये सामान्य नागरिक घरात जाणार असल्याने यावेळी आतला नजारा काही औरच असणार आहे. यावेळी सलमान शो होस्ट करणार असल्याचे समोर आले आहे. 2006 मध्ये बिग बॉसचा पहिला सीझन आला होता. तेव्हापासून वाद हेच बिग बॉसचे सर्वात मोठे भांडवल राहिलेल आहे. Kissing पासून ते प्रेग्नंसीपर्यंतच्या वृत्तांमुळे या शोने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. बिग बॉसच्या यापूर्वीच्या सीझनमधील अशाच काही वादांवर एक नजर टाकुयात.

डिआंड्रा सॉरेसच्या प्रेग्नंसीचे वृत्त
Bigg Boss सीझन : 8
'बिग बॉस 8' मधून जेव्हा मॉडेल आणि टिव्ही पर्सनालिटी डिआंड्रा सॉरेस बाहेर पडली त्यावेळी ती प्रेग्नंसीमुळे बाहेर पडल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. तिच्या प्रेग्नंसीचा संबध या पर्वाचा विजेता गौतम गुलाटीबरोबरही जोडला जात होता. डिआंड्रा आणि गौतम एकमेकांच्या चांगलेच जवळ आले होते. अनेकदा त्यांना बाथरूममध्ये लॉक झालेलेही पाहायला मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...