आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बिहारी बाबूने WWE रेसलरबरोबर तयार केली हॉलिवूड फिल्म, यामुळे परतला भारतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार छपराच्या राहणाऱ्या प्रभाकरण शरणला बॉलिवूडमध्ये रिजेक्ट करण्यात आले होते. पण आता तोच हॉलिवूडमध्ये लीड अॅक्टर म्हणून काम करत आहे. सध्या तो बिहारमध्ये आहे. त्याने एक हॉलिवूड चित्रपट तयार केला होता, तो आता हिंदी आणि भोजपुरीमध्ये भारतात रिलीज करत आहे. चित्रपटात WWE चा फायटर स्कॉट स्टाइनरबरोबर डायलॉग बोलताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'एक चोर दो मस्तीखोर' असे ठेवले आहे. 10 नोव्हेंबरला हिंदी आणि आठ डिसेंबरला भोजपुरी भाषेत हा चित्रपट रिलीज होतोय. 
 
अशा आहे प्रभाकरची रियल लाईफ स्टोरी.. 
- पाटणामध्ये बोलताना प्रभाकरने सांगितले की, त्याने चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिली आहे. तसेच चित्रपटात लीड रोलही केला आहे. चित्रपटाचे ओरिजनल नाव आहे. 'एनरेडाडोसः ला कन्फ्यूजन'.  
- चित्रपटाचे दिग्दर्शन आशीष आर मोहनने केले आहे. चित्रपटात फायटर स्कॉट भोजपुरीत बोलताना दिसणार आहे. तो म्हणाला, चित्रपटाची स्टोरी लियोवर आधारित असून, प्रेम आणि पैसा या गोंधळात तो अडकलेला पाहायला मिळणार आहे. 
- एका दरोड्यात त्याला अॅना भेटते आणि त्यांच्यात प्रेम जुळायला लागले. चित्रपटाचे शुटिंग कोस्टारिकामध्ये झाले आहे. 

पाटणा येथे 10 वीपर्यंत शिक्षण 
अमनौर येथील रहिवासी प्रभाकर ने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी फार स्ट्रगल केला पण त्याच्या नशीबी आला केवळ नकार. पण हाच प्रभाकर आता हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका करत आहे. पटना येथील सेंट्रल स्कुलमध्ये 10 वी पर्यंत त्याने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्ट्रगल करत कपड्याचे दुकानही थाटले. 

मनोज वाजपेयीच्या वडिलांची चिठ्ठी घेऊन भेटला अनेक निर्माता-दिग्दर्शकांना..
प्रभाकरणने एका मुलाखतीत सांगितले की जेव्हा त्याने अभिनेता बनण्याचा विचार केला तेव्हा तो मनोज वाजपेयीच्या वडिलांना जाऊन भेटला. त्यानंतर प्रभाकरणने त्यांच्याकडून एक चिठ्ठी लिहून घेतली आणि मुंबईला जाऊन अनेक निर्माता दिग्दर्शकांना जाऊन भेटला. त्यानंतर प्रभाकरण बिझनेसच्या कामानिमित्त लॅटीन अमेरिका च्या कोस्टारिका ला जाऊन पोहोचला. तिथे त्याने मुलतानी माती, अगरबत्ती, लाकूड विकण्याचे काम केले. त्यानंतर त्याने टेक्सटाइल बिझनेस सुरु केला.
प्रभाकरणने बॉलिवूडच्या मॉन्सटर ट्रक जॅम शो मध्येही काम केले. नंतर प्रभाकरणने कोस्टारीका मध्ये बॉलिवूडचे पाच ते सहा चित्रपट रिलीज केले. 2006 साली त्याने लॅटीन मध्ये अक्षय कुमारचा चित्रपट गरम मसाला, कहो ना प्यार है, बनारस यांसारखे चित्रपट रिलीज केले. त्यावेळी तो 20-25 लाख रुपयात चित्रपट खरेदी करत असे, विशेष म्हणजे त्याची कमाई त्यावेळी केवळ 2-3 लाख होती.

आईवडिल दोघेही ग्रामीण बँकेमध्ये आहेत मॅनेजर..
प्रभाकरणचे आईवडिल प्रभुनाथ शरण आणि शुभद्रा प्रसाद दोघेही रिटायर्ड बँकर आहेत. सध्या ते मोतिहारी येथे राहतात. प्रभाकरण ला कोस्टारीका मध्ये पैशाची तंगी जाणवू लागली त्यामुळे तो पुन्हा भारतात परतला. 2010 साली चार वर्षापर्यंत तो पंचकुला येथे राहिला. यादरम्यान तो त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी झाली आणि मुलीला घेऊन पुन्हा कोस्टारीकाला परतली. यावेळी प्रभाकर अत्यंत तणावात होता. पण हार न मानतो तो पुन्हा कोस्टारीकाला परतला.

१४ देशात रिलीज झाला होता चित्रपट
प्रभाकरने सांगितले की लॅटीन अमेरिकामध्ये त्याचा 'इनरेदादोस: ला कन्फ्यूजन’हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट याच वर्षी 9 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभाकर लीड रोल मध्ये होता. अमेरिकासोबत 14 देशात हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष मोहन आहे ज्यांनी 2012 साली आलेला चित्रपट अक्षय कुमार यांचा 'खिलाडी 786' दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे निर्माण कोस्टारीका चे टेरेसा रॉड्रिग्स ने केले होते. हाच चित्रपट आता हिंदी आणि भोजपुरीत येत आहे. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रभाकर शरण आणि त्याच्या चित्रपटाचे काही फोटोज्..
 
 
 
बातम्या आणखी आहेत...