एन्टरटेन्मेंट डेस्क - ग्लॅमगर्ल बिपाशा बासू हिने नुकताच वाढदिवस साजरा केला. काही महिन्यांपूर्वीच बिपाशाचे तिचा बॉयफ्रेंड करणसिंह ग्रोवरबरोबर लग्न झाले आहे. त्यामुळे लग्नानंतरचा पहिला वाढदिवस बिपाशासाठी खास असणारआ आहे. बिपाशा आणि करणच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. या दोघांनीही लग्न चांगलेच एन्जॉय केले होते. बिपाशाने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेयरही केले होते. बिपाशा-करणच्या भव्यदिव्य लग्नसोहळ्याची झलक या छायाचित्रांमध्ये बघायला मिळाली होती.
बंगाली पद्धतीने झाले लग्न...
-बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवरचे बंगाली पद्धतीने लग्न झाले. 30 एप्रिल रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
- सब्यसाचीच्या डिझायनर लाल लहेंग्यात 37 वर्षीय बिपाशा अतिशय सुंदर दिसली.
- बिपाशाने ट्रेडिशनल बंगाली लूकमध्ये डान्स करत स्टेजवर एन्ट्री घेतली होती.
- बँडसोबत करण एका टॉय स्कूटरवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला.
मंकी वेडिंग नावाची चर्चा..
- बिपाशाने फोटो ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले. #monkeywedding हा हॅशटॅग देऊन बिपाशाने शेअर केले आहेत.
- या विवाहसोहळ्याला #monkeywedding म्हणण्यामागचे कारण म्हणजे बिपाशा करणला प्रेमाने मंकी संबोधते. त्यामुळे या विवाहाला मंकीवेडिंग म्हटले गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा आणि करणच्या लग्नातील काही खास क्षण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)