आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu And Karan Singh Grovers Wedding Ceremonies Begin

बिपाशाच्या लग्नविधींना सुरुवात : करण म्हणाला, \'तुला भेटून माझी सगळी स्वप्ने झाली पूर्ण\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी बिपाशाच्या घरी पुजेचे आयोजन करण्यात आले होते. वडिलांसोबत पूजा करताना बिपाशा दिसतेय. - Divya Marathi
गुरुवारी बिपाशाच्या घरी पुजेचे आयोजन करण्यात आले होते. वडिलांसोबत पूजा करताना बिपाशा दिसतेय.

मुंबईः बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या लग्नाच्या विधींनी सुरुवात झाली आहे. उद्या 30 एप्रिल रोजी बंगाली पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा होणारेय. बिपाशाने काही फोटोज ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. शिवाय करणनेदेखील बिपाशासोबतचा हा फोटो शेअर करुन बिपाशासाठी एक प्रेमळ संदेश दिला आहे. करण म्हणतो, ''तुला भेटल्यानंतर माझी सगळी स्वप्ने पूर्ण झाली आहेत. गुरुवारी बिपाशा आणि करणच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते.''


गोव्यात झाली होती दोघांची बॅचलर पार्टी...

लग्नापूर्वी बिपाशासाठी तिच्या फ्रेंड्स आणि बहिणींनी ब्राइडल शॉवर ठेवला होता. गोव्यात झालेल्या या पार्टीचे अनेक फोटो बिपाशाने इंस्टाग्रामवर शेअर केले. एका फोटोमध्ये ती रेड ड्रेसमध्ये फुग्यांमध्ये बसलेली दिसत आहे. इतर फोटोंमध्ये बिपाशाने व्हाइट अँड ब्लॅक आऊटफिटसोबत Bride-To-Be स्ट्रीपचा क्रॉस बेल्ट घातलेला आहे. बिपाशाच नव्हे तर करणनेसुद्धा मित्रांसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय केली. यादरम्यान करण आणि त्याचे मित्र व्हाइट आऊटफिटमध्ये दिसले. करणच्या टी-शर्टवर एका माकडाचा फोटो आहे, त्यासोबत लिहिले होते, Groom. इतर मित्रांनी Karan's MonkeyPack प्रिंटेड टी-शर्ट परिधान केलेले होते.
लग्नात काय परिधान करणार बिपाशा-करण?
- बिपाशाची स्टायलिस्ट श्यामली अरोराने सांगितले, की लग्नात दोघेही डिझायनर सब्ससाची मुखर्जीने डिझाइन केलेले कपडे परिधान करणार आहेत. बिपाशाचा ड्रेस लाल रंगाचा आहे.
- करणच्या ड्रेसचा शेडसुद्धआ बिपाशाच्या ड्रेसशी मॅच करणारा आहे. मात्र दोघांनाही एकमेकांच्या ड्रेसविषयी काहीच कल्पना नाहीये. दोघांसाठीही हे सरप्राइज असेल.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बिपाशा-करणची नुकतीच शेअर झालेली आणि सोबतच गोव्यात झालेल्या बॅचलर पार्टी खास झलक...