आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu Dinner Date With Boyfriend Karan Singh

PHOTOS : बिपाशाने 'बॉयफ्रेंड'सोबत डिनर डेट केली एन्जॉय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा कथित बॉयफ्रेंड आणि टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर बुधवारी उशीरा रात्री डिनर डेटवर गेले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करण आणि बिपाशाने मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये डिनर एन्जॉय केला. यावेळी दोघांमध्ये उत्तम केमिस्ट्री दिसली. करणच्या सोबतीत बिपाशा आनंदी दिसली. इतकेच नाही तर डिनरनंतर करणने बिपाशाला घरी सोडले.
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'अलोन' या सिनेमाच्या सेटवर बिपाशा आणि करणचे सूत जुळल्याचे समजते. मात्र अद्याप दोघांनीही सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही.
नोटः काही दिवसांपूर्वी करण त्याची पत्नी जेनिफर विंगेटपासून विभक्त झाला आहे. तर अभिनेत्री बिपाशा बसूचेही हरमन बावेजासोबत ब्रेकअप झाले आहे.
पुढे पाहा, करण-बिपाशाच्या डिनर डेटची छायाचित्रे...