आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: आयुष्मानसाठी लकी ठरली पत्नी ताहिरा, लग्नाच्यावेळी अकाउंटमध्ये होते केवळ 10 हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'विकी डोनर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष्मान खुराणाने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 सप्टेंबर 1984 रोजी पंजाबमधील चंदीगड येथे जन्मलेल्या आयुष्मानने आपले शिक्षण येथूनच पूर्ण केले. शालेय शिक्षणानंतर त्याने इंग्लिश साहित्यात ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने रंगभूमीवर पाच वर्षे काम केले आहे. एका मुलाखतीत आयुष्मानने कबुल केले होते, की ताहिरासोबत लग्न झाल्यानंतर त्याचे आयुष्य बदलून गेले आहे. लग्नापूर्वी तो आर्थिक तंगीला सामोरे जात होता. लग्नाच्यावेळी त्याच्या अकाउंटमध्ये केवळ दहा हजार रुपये होते.
बालपणीच्या मैत्रिणीसोबत थाटले लग्न
आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यप त्याची बालपणीची मैत्रीण आहे. ताहिरा 16 वर्षांची असताना आयुष्मान आणि तिची पहिली भेट झाली होती. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या परिचयाचे होते. जवळजवळ 12 वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. ताहिरा आयुष्मानसाठी लकी ठरली. लग्नानंतर बॉलिवूडमध्ये त्याच्या यशस्वी करिअरला सुरुवात झाली. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पती अभिनेता असूनदेखील ताहिरा लाइमलाइटपासून दूर आहे. ती एक लेखिका आहे.

आयुष्मानला एमटीव्ही रोडीजमुळे मिळाली ओळख
आयुष्मानने अँकर आणि रेडिओ जॉकीच्या रुपात आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र त्याला खरी ओळख 2004 मध्ये एमटीव्ही रोडीजच्या दुस-या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर प्राप्त झाली. यापूर्वी तो दिल्लीतील बिग एफएममध्ये आरजे होता. रेडिओनंतर आयुष्मानने एमटीव्हीच्या अनेक शोजमधअये व्हिडिओ जॉकी म्हणून काम केले. याशिवाय तो टीव्हीवर इंडियाज गॉट टॅलेंट, म्यूझिक का महामुकाबला हे टीव्ही शोज होस्ट करताना दिसला.

'विकी डोनर'द्वारे केले बॉलिवूडमध्ये डेब्यू
2012 मध्ये 'विकी डोनर' या सिनेमाद्वारे त्याने सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. स्पर्म डोनेशनवर आधारित हा सिनेमा बराच गाजला आणि सोबतच आयुष्मानच्या अभिनयाचेही कौतुक झाले. या सिनेमातील 'पानी दा रंग...' हे गाणे स्वतः आयुष्मानने गायले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा आणि फिल्मेफअरचाच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा अवॉर्ड मिळाला होता. विकी डोनरनंतर आयुष्मानचे नौटंकी साला (2013), बेवकूफियां (2014), 'हवाईजादा' (2015) हे सिनेमे रिलीज झाले. मात्र या सिनेमांचे विशेष असे कौतुक झाले नाही. 'दम लगा के हईशा' या सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने आयुष्मानने पुन्हा एकदा प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवाई मिळवली.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आयुष्मानची पत्नी ताहिरासोबतची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...