Home »Gossip» Birthday Special 75 Unknown Facts Of Amitabh Bachchan

B'day: बच्चन नाहीये खरे आडनाव, व्हायचे होते इंजिनिअर, वाचा महानायकाचे 75 Unknown Facts

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 15:07 PM IST


एंटरटेन्मेंट डेस्कः शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट त्यांचे चाहते जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यांच्याविषयीच्या काही गोष्टी त्यांच्या चाहत्यांना ठाऊक देखील आहेत. अलाहाबादच्या एका साध्या वसाहतीत जन्मलेले अमिताभ बच्चन ऊर्फ अमित श्रीवास्तव कधी काळी बॉलिवूडचे सुपरस्टार होतील, असे कुणाला वाटले नव्हते. अमिताभ यांच्या आयुष्याशी जुळलेली प्रत्येक गोष्ट रंजक आहे. बिग बींचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत.

या खास पॅकेजमधून divyamarathi.com तुम्हाला त्यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत खासगी, प्रोफेशनल लाइफ, आवडी-निवडीशी निगडीत एक दोन नव्हे तर तब्बल 75 फॅक्ट्स सांगत आहोत...
1.
आर्ट्सविषयात डबल मास्टर्स डिग्री.
2.
इंजिनिअर बनून इंडियन एअरफोर्स जॉईन करायची अमिताभ यांची इच्छा होती.
3.
दिल्लीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पहिली नोकरी कोलकातामधील एका शिपिंग फर्ममध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून केली होती.
4.
येथे त्यांचा पहिला पगार 500 रुपये होता.
5.
अमिताभ यांनी ब्रोकर म्हणून दुसरी नोकरीसुद्धा कोलकातामध्येच केली होती.
6..
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांचा शेवटचा पगार 1680 रुपये होता.
7.
कोलकातामध्ये नोकरी करत असताना त्यांनी सेकंड हँड फिएट कार खरेदी केली होती. ही त्यांची पहिली कार होती.
8.
अमिताभ यांचे खरे आडनाव श्रीवास्तव आहे. मात्र वडिलांचे 'बच्चन' हे टोपणनाव ते आडनाव म्हणून वापरतात.
बिग बींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended