आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Actor Arjun Rampal\'s Wife Mehr Jesia Turned 47

B\'day: मिस इंडिया होती अर्जुन रामपालची पत्नी, पतीपेक्षा आहे 4 वर्षांनी मोठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहर जेसिया
 
बॉलिवूड अभिनेता अर्जुल रामपालची पत्नी आणि 90sची प्रसिध्द सुपरमॉडेल मेहर जेसिया आज 47वा वाढदिवस साजरा करत आहे. मेहरचा जन्म 30 नोव्हेंबर 1969ला एका पारसी कुटुंबात झाला. तिने करिअरची सुरुवात 1980मध्ये केली. 
 
एकेकाळी होती मिस इंडिया 
जोसियाने 1986मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. त्यानंतर मेहरचे नाव इंडियन सुपरमॉडेल्सच्या पहिल्या जनरेशनमध्ये सामील झाले. मेहर एकेकाळी सर्वाधिक कमाई करणारी मॉडेल होती. सध्या ती मॉडेल मॅनेजमेंट एजेन्सी चालवते.
 
मेहर आणि अर्जुन रामपाल 1998मध्ये लग्नगाठीत अडकले. दोघांना दोन मुले असून त्यांची नावे महिका (15 वर्षे) आणि मायरा रामपाल (10 वर्षे) आहेत. विशेष म्हणजे मेहर अर्जुनपेक्षा तब्बल चार वर्षांनी मोठी आहे. 
 
निर्मातीसुध्दा बनली- 
मेहरने निर्माती म्हणून 2006मध्ये मोठ्या पडद्यावर एंट्री केली. तिने अर्जुन रामपालसोबत \'आई सी यू\' सिनेमा तयार केला. या सिनेमात अर्जुन रामपाल, विपाशा अग्रवाल, सोनाली कुलकर्णी आणि बोमन ईराणी मुख्य भूमिकेत होते. 
 
चर्चेत राहिले खासगी आयुष्य- 
हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटानंतर सांगण्यात आले होते, की अर्जुन आणि सुझानच्या वाढत्या जवळीकमुळे अर्जुन-मेहरच्या नात्यात दरी आली आहे. मात्र नंतर या बातम्या अफवा असल्याचे सांगण्यात आले.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मेहरचे न पाहिलेले फोटो...